कन्या प्रशालेत स्मृती दिना निमित्त आयोजित स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 16 मार्च 2018


कै.वामनराव शिंदे साहेब यांचे शिक्षण क्षेत्राबरोबर उद्योजक तयार करण्याचे कार्य आदर्शवत-बाबुराव गायकवाड

सांगोला/प्रतिनिधी : 
संस्थापक कै.वामनराव शिंदे साहेब यांनी तालुक्यात मशिनरी व्यवसायाच्या माध्यमातून अनेक उद्योजक तयार केले पण त्याला त्यांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची जोड देवून आदर्श कन्या प्रशालेची स्थापना केली. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वस्तरातील विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद व आदर्शवत असल्याचे प्रतिपादन सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी व्यक्त केले.
कै.वामनराव शिंदे साहेब यांचा 25 वा स्मृतीदिन कन्या प्रशालेत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बाबुराव गायकवाड बोलत होते. यावेळी उद्योगपती अरुण पाटील, महिला सूत गिरणीच्या उपाध्यक्षा कल्पनाताई शिंगाडे, संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे, जेष्ठ महिला संघटनेच्या आशाताई सलगर, बणजगोळचे मा.सरपंच रामभाऊ शिंदे, शहीद कामटे संघटनेचे सचिव अच्युतराव फुले, प्रा.राजलक्ष्मी निलकंठ शिंदे, मुख्याध्यापिका सुवर्णप्रभा घोरपडे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 
पुढे बोलताना बाबुराव गायकवाड म्हणाले की, विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान आत्मसात न करता इतर ज्ञानार्जन ही आपल्यासाठी खुले असून ते अंगीकारावेत. त्याचबरोबर शिक्षकांनी अध्यापना व्यतिरिक्त एक सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी कटीबध्द रहावे. यावेळी त्यांनी कै.शिंदे साहेब यांच्या सानिध्यात आलेल्या आठवणींना उजाळा देवून आदरांजली अर्पण केली. 
कार्यक्रमाचे सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष वामनराव शिंदे साहेब व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 
प्रशालेतील विद्यार्थीनी कु.सोनाली मासाळ, गायत्री बोराटे, मनिषा माने या विद्यार्थीनींनी स्मृतीदिना निमित्त मनोगते व्यक्त केली. प्रशालेस आ.गणपतराव देशमुख यांच्या निधीतून मिळालेल्या संगणक व त्या संगणक कक्षाचे उद्‌घाटन उद्योगपती अरुण पाटील व कल्पनाताई शिंगाडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी संस्थापक कै.शिंदे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचा पारितोषिक बक्षिस वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रा.निलकंठ शिंदे यांनी तर सुत्रसंचालन व आभार सुवर्णा घोरपडे यांनी मानले. सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.










पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments