महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी! डॉ. मनोज लोखंडे

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 मार्च 2018


ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्यावतीने महिला दिन साजरा!
पंढरपूर (प्रतिनिधी) : महिला संपूर्ण कुटुंबाचा कणा असून तिच्यावर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य अवलंबून असते. तिने आरोग्याची काळजी न घेता कानाडोळा केला तर किरकोळ आजाराचे रुपांतर कर्करोगासारख्या गंभीर रोगात होऊ शकते त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी! असे प्रतिपादन साताऱ्यातील कर्करोग तज्ञ डॉ. मनोज लोखंडे यांनी केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्यावतीने फडे नर्सिंग होम मध्ये महिला दिनानिमित्त आयोजित “महिलांचे आरोग्य!” या व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर कर्करोग तज्ञ डॉ. मनोज लोखंडे, पंढरपूर येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. स्वाती बोधले, आदर्श माता श्रीमती कमल फडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे महासचिव प्र. वि. कुलकर्णी, पुणे विभागाचे सचिव प्रा. गुरुनाथ बहिरट, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश फडे, शहराध्यक्ष दिनेश खंडेलवाल, उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. मनोज लोखंडे म्हणाले की, कर्क रोग वेळीच निदान होऊन योग्य उपचार केला तर तो रुग्ण बरा होऊ शकतो. अमेरिकेत स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्यू मुखी पडणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण भारतातील स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. त्याची कारणमिमांसा करताना त्यांनी कर्करोगबाबत असणारे गैरसमज, भीती आणि अंधश्रद्धा अशी कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय कर्करोगाचे महिलांमध्ये आढळून येणारे इतर प्रकारही त्यांनी विषद करून तो होण्याची कारणेही त्यांनी सांगितली. याच वेळी स्त्रीरोग तज्ञ डॉ. सौ. स्वाती बोधले यांनी महिला आरोग्यदायी जीवनासाठी आहार विहार आणि जीवनशैली कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श माता श्रीमती कमल रतनचंद फडे यांचा सन्मान सौ. ज्योती खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी प.पु. भैय्यू महाराजांच्या सर्वोदय मंडळातर्फे पक्ष्यांसाठी मातीच्या पाण्याच्या भांड्यांचे वाटप यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.   
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. वर्षा गायकवाड यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. श्रद्धा बहिरट यांनी आणि आभार प्रदर्शन प्रा. गुरुनाथ बहिरट यांनी केले. यावेळी नंदकुमार देशपांडे, पांडुरंग बापट, विजय सामंत, दत्तात्रय ताठे, विजय वरपे, स्वप्नील फडे, बापू गायकवाड, जम्बुकुमार गांधी, श्रीनिवास खाबाणी, महादेव खंडागळे, सुधाकर खरात, डॉ. अनुप फडे, निलेश केंदळे, झाकीर नदाफ,  मारुती मासाळ, कबीर देवकुळे, सुरेश चंकेश्वरा, तानाजी घाडगे, वैभव फडे, खंडागळे, महिला सदस्य डॉ. सपना फडे, सौ. आवताडे, सौ. कुलकर्णी, सौ. खाबाणी, सौ. तनुजा ताठे,  सौ. सविता देशपांडे, श्रीमती विजया बहिरट, सौ. दामोदरे, सौ. वंदना सामंत, सौ. रंजना आर्वे, सौ. ज्योती केंदळे सौ. सुनिता चौगुले सुनिता फडे यांच्यासह परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता चिंतामणी दामोदरे, मिलिंद वाईकर, सागर रणदिवे, सचिन आवताडे, विशाल खंडागळे, महेश देठे, ओंकार व्यवहारे यांचे परिश्रम लाभले.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments