लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 14 मार्च 2018
सोलापूर दि. 14 :- पंढरपूर नगरपरिषदेमार्फत पंढरपूर शहरातील भीमा नदी पूल ते मटन मार्केट ते अर्बन बँक या रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याच्या कामामुळे पंढरपूर शहरात वाहतूकीची कोंडी निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधिक्षक एस. वीरेश प्रभू यांनी मुंबई पोलीस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) अन्वये 9 मार्च ते 7 एप्रिल 2018 या कालावधीसाठी या रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक अनय् मार्गाने वळवली आहे.
या आदेशानूसार सोलापूर, मोहोळ, शेटफळ चौक, टेंभूर्णी, कामती कडून तीन रस्ता मार्गे पंढरपूर शहरात येवून मटन मार्केट अर्बन बँक मार्गे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या एसटी बसेस, खाजगी बसेस, ट्रक, डंपर, ट्रॅक्टर जिप, पिकअप, रिक्षा व इतर सर्व प्रकारची वाहने तीन रस्ता येथून प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग :- तीन रस्ता शेटफळ चौक अहिल्यादेवी चौक नवीन सोलापूर नाका सरगम चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
पंढरपूर शहरातून अर्बन बँक मटन मार्केट अंबाबाई पटांगण मार्गे नवीन पूलावरुन तीन रस्ता मार्गे जाणारे सर्व प्रकारची वाहने एसटी बसेस, खाजगी, बसेस, ट्रक डंपर, ट्रॅक्टर, जिप, पिकअप, रिक्षा व इतर सर्व प्रकारची वाहने यांना सहकार चौक इंदिरा गांधी चौक येथून प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग :- सहकार चौक, सरगम चौक नवीन सोलापूर नाका, अहिल्यादेवी चौक मार्गे इच्छित स्थळीत जातील.
पंढरपूर शहरातील अंतर्गत वाहनासाठी अर्बन बँक अनिल नगर उपजिल्हा रुग्णालय अंबाबाई पटांगण य मार्गावर कोणतेही वाहन पार्क होणार नाही याबाबत सदरचा रोड नो पार्किंग करण्यात आहे. तसेच अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक या रस्त्यावरुन ही अंतर्गत वाहतूक होणार असल्याने सदरचा रस्ता नो पार्किंग करण्यात येत आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments