लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 14 मार्च 2018
सोलापूर दि. 14 :- जागतिक ग्राहक दिनानिमित्त 15 मार्च 2018 रोजी होम मैदान, येथे ग्राहक मेळावा आणि ग्राहकांच्या प्रबोधनासाठी ऑनलाईन बँकिंग या विषयावर व्याख्यान आयेाजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत होम मैदान येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे हस्ते आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. होम मैदान येथे आयोजित ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील शासकीय विभागामार्फत ग्राहकांच्या प्रबोधनासाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत.
दिनांक 15 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता ग्राहक प्रबोधनात चार पुतळा ते होम मैदान या मार्गावर रॅलीचे आयोजनही करण्यात आल्याचे श्री. पाटोळे यांनी सांगितले.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments