इसबावी येथील नव्याने बांधण्यात येणा-या १० लाख लीटर पाण्याच्या टाकीचा भुमीपुजन समारंभ संपन्न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!



पंढरपूर LIVE 29 मार्च 2018

पंढरपूर शहर हद्दीतील इसबावी येथील विसावा मंदिराच्या उत्तर बाजुस असणा-या जागेत १० लाख लीटर पाण्याच्या टाकीच्या भुमीपुजन समारंभ आ.प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष व या प्रभागातील नगरसेवक विशाल मलपे, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, पाणीपुरवठा सभापती सुप्रिया डांगे, नगरसेविका भाग्यश्री शिंदे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी नगरसेवक गणेश आधटराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी बोलताना आ.प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, इसबावी भागासाठी यापुर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाकीवरुन इसबावीची उत्तर व दक्षिण बाजुस पाणीपुरवठा केला जात होता. परंतु त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोक वस्ती वाढल्याने पाणीपुरवठा पुरेशा दाबाने होत नव्हता व या ठिकाणी वाढती लोकसंख्या व लोकवस्ती विचारात घेता नविन पाण्याची टाकी बांधण्यासाठी या भागातील नगरसेवक व उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी नगरसेवक गणेश आधटराव, सौ.भाग्यश्री शिंदे यांनी मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा करुन उत्तर इसबावी भागातील नागरिकांची कायम स्वरुपी पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने १० लाख लीटरची पाण्याची टाकी बांधण्याकामी शासनाकडुन र.रु.३ कोटी मंजुर करुन घेतलेली आहेत. या पाण्याच्या टाकीचा इसबावीच्या उत्तर भागातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे असे सांगितले. या कार्यक्रमास नगरसेविका शकुंतला नडगिरे, अर्चना रानगट, नगरसेवक विक्रम शिरसट, नरसिंह शिंगण, संजल निंबाळकर, ऋषीकेश उत्पात व माजी पक्षनते सचिन डांगे, इब्राहीम बोहरी, बसवेश्वर देवमारे, नवनाथ रानगट, पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव, अशोक भालेराव व या भागातील नागरिक सुभाष शिंदे, परमेश्वर शिंदे, मुजावर गुरुजी, आबाजी शिंदे, राजेंद्र पवार, अनिता पवार, बबन पवार, सोमनाथ काळे, सलिम मुजावर, पिंटु बारगंडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल अभंगराव व आभार विशाल मलपे यांनी मांडले.









पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments