अंकुश गाजरे यांना वैदर्भीय साहित्य संघाचा पुरस्कार

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 मार्च 2018


   प्रतिनिधी/पंढरपूर
शेळवे (ता.पंढरपूर)येथील साहित्यिक अंकुश गाजरे यांना नुकताच अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संघ नागपूर चा "इंदिराबाई रुईकर स्मृती पुरस्कार" जाहीर झाला आहे. त्यांच्या "गावमातीतली माणसं" या व्यक्तिचित्रणासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर यांनी सांगितले.
    दि १६ मार्च, शुक्रवार रोजी सायंकाळी ०५ वाजता श्रीमंत धानवटे सभागृह नागपूर या ठिकाणी  कुलगुरू डॉ.वेदप्रकाश मिश्रा व नागपूर च्या महापौर श्रीमती नंदाताई रिचकार यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.
   शाल, श्रीफळ, रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. "गावमातीतली माणसं"या पुस्तकासाठी मिळालेला हा चौथा राज्यस्तरीय पुरस्कार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार दत्तात्रय सावंत, डॉ. द. ता. भोसले, राजेश पवार, कल्याणराव शिंदे,कवी गणेश गायकवाड तसेच साहित्यिक व साहित्यप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments