ओपनचे डंपिंग ग्राऊंड करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवु

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 31 मार्च 2018
आंदोलनाला अॅड. अजित देशमुखांचे समर्थन ठरले लक्षवेधी

बीड निलेश चाळक :-आरक्षित प्रवर्गातुन निवड किंवा बदली झालेल्या व नंतर बेकायदा ओपनवर टाकलेल्या 600 पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षक संवर्गातील पदांचे आक्षेप माहीती अधिकारात ऊघड झाले. या त्रुटी प्रशासनाकडे पुराव्यांसह नोंदवुन रोष्टर दुरुस्तीच्या प्रतिक्षेत बीड खुला प्रवर्ग महासंघ गेल्या 6 महीन्यापासुन न्यायाची सनदशीर मार्गाने मागणी करत आहे. परंतु त्याकडे सवयीप्रमाणे कानडोळा करत बीड जिल्हा प्रशासन खुल्या प्रवर्गाचे अनैतिक ब्लॉकींग व डंपिंग अधोरेखित करण्याच्याच प्रयत्नात दिसले. त्यामुळे नाविलाजास्तव या अन्यायाविरुद्ध बीड खुला प्रवर्ग महासंघाने दि.  26/03/2018 पासुन बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते. सदर आंदोलनाला मिळालेले राजकीय व अराजकीय समाजप्रतिनिधींचे सक्रीय समर्थन पाहुन बीड जि प प्रशासनाचे तर धाबेच दणाणले आहे. प्रथमच राजकारण बाजुला सारत ओपनच्या न्यायासाठी सर्वजण एकवटलेले दिसले. जवळपास सर्व जि प सदस्य, सर्व मराठा क्रांती मोर्चा पदाधिकारी, मराठा समाजच्या सर्वच संघटना यांनी सदर आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे. या दुसऱ्या "'क्रांती'" मुळे तर घोटाळेबाजांची चांगलीच धडकी भरली आहे.


आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अॅड. अजित देशमुख यांनी या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी खुला प्रवर्ग महासंघाने 600 पुराव्यांनिशी तयार केलेली फाईल त्यांना दाखवण्यात आली. या अन्यायाविरुद्ध बीड खुला प्रवर्ग महासंघाच्या आंदोलनाला सक्रीय पाठींबा त्यांनी जाहीर केला. या प्रकरणात वैयक्तीक लक्ष घालतो व भ्रष्टाचाऱ्यांना त्यांची जागा दाखवुन देतो, असा निर्धार त्यांनी केला. योग्य वेळी सक्षम प्राधिकरणासमोर माझ्या पद्धतीने आंदोलन करेन असे आश्वासन त्यांनी दिले. सर्वोच्च न्यायालय, ऊच्च न्यायालय व महाराष्ट्र शासन यांच्या निर्णयांना डावलुन गैरप्रकारांना अभय कोण व कशासाठी देतंय?  सबंध राज्यापेक्षा बीडसाठी नियम व कायदे वेगळे कशासाठी? हे प्रश्न त्यांनी ऊपस्थित केले. गरज पडल्यास सक्षम न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली. बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ जर आपल्यासोबत असतील, तर खुल्या प्रवर्गाला न्याय मिळणारच, असा आशावाद बीड खुला प्रवर्ग महासंघाने अॅड अजित देशमुखांचे आभार मानताना व्यक्त केला.

दरम्यान प्रशासनाच्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेऊन सदरचे आंदोलन तुर्त स्थगित केल्याचे कळते. परंतु परीस्थितीनुसार पुढचे आंदोलन याहीपेक्षा तीव्र असेल, असा ईशारा बीड खुला प्रवर्ग महासंघाने दिला आहे.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments