युटोपियन शुगर्स च्या गळीत हंगामाची सांगता ; 25 दिवसाचा बक्षीस पगार जाहीर.. युटोपियन शुगर्स चा पांडुरंग परिवाराला अतिरिक्त ऊस प्रश्नी फायदा. :- सुधाकरपंत परिचारक

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!




पंढरपूर LIVE 31 मार्च 2018

              मंगळवेढा प्रतींनिधी ;पंतनगर,कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स या कारखान्याने चालू वर्षी 616025 इतके मे.टन ऊसाचे गाळप करून पांडुरंग परिवारातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावल्याने पांडुरंग परिवाराला फायदा झाला असल्याचे मत पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक यांनी गळीत हंगाम 2017-2018 च्या सांगता समारंभ कार्यक्रमा प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
        पुढे बोलताना सुधाकरपंत परिचारक म्हणाले की, पांडुरंग परिवारातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी विविध अडचणींचा सामना करीत युटोपियन शुगर्स ची निर्मिती केली. मी सहकाराशी एकनिष्ठ असल्याने खाजगी साखर कारखानदारीस माझा सुरुवातीपासूनच विरोध होता. तरीही पांडुरंग परिवारातील युटोपियन  शुगर्स असल्याने युटोपियन शुगर्स ने अल्पावधीत साखर कारखानदारीत आपले वेगळे नाव कमवित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.कर्मचारी वर्ग यांनी हा हंगाम अतिशय शिस्तबद्ध नियोजनाने व्यवस्थित पार पाडल्या बद्दल युटोपियन प्रशासनाने सर्व कर्मचारी यांना 25 दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देण्याची सूचना केली. तात्काळ सदरची सूचना आम्ही स्वीकारत असल्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी संगीतले.
           या वेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणाले की मागील सलग दोन ते तीन वर्षापासून प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे.तरीही राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने आपल्या जिल्ह्यात आहेत.त्यामुळे साहजिकच कारखानदारांमध्ये स्पर्धा निर्माण होत आहे.कारखानदारांनी स्पर्धा करीताना ऊस उत्पादकांच्या भविष्यातील हिताचा विचार करून तसेच कारखान्यातील कर्मच्यार्‍यांच्या हिताचा विचार करून कारखानदारी टिकविण्यासाठी दक्ष राहून कारखाना व्यवस्थापनाने कारखानदारी चालवली पाहिजे. एका बाजूला अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे, ऊस दरामध्ये स्पर्धा आहे. तसेच दुसर्‍या बाजूला कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेस योग्य बाजारभाव मिळत नाही. गळीत हंगामाच्या सुरूवातीस असणारा बाजारभाव व सध्या असणारा बाजारभाव यात 800 रूपयांचा फरक आहे. ऊस उत्पादकांच्या अपेक्षा पूर्ण करताना कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांची कर्ज उभारणी करून ऊस उत्पादकांच्या हितासाठी साखर कारखान्यांची निर्मिती केली.ते कारखाने टिकणे व टिकवणे ही काळाची गरज आहे. अन्यथा मोठ्या प्रमाणात बेरोजगारी बरोबरच अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होईल. युटोपियन शुगर्सच्या प्रगतीचा आलेख हा सुरुवातीपासूनच चढता आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होणार असून बदलत्या काळाची पावले ओळखून ऊस उत्पादक यांनी नियोजन करणे आवश्यक आहे. युटोपियन शुगर्स ने ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन करून भरीव कामगिरी केल्याने व पांडुरंग परिवारातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागल्याने युटोपियन शुगर्स च्या निर्मितीचा हेतु साध्य झाला असल्याचे समाधान वाटत आहे. गळीत हंगाम यशस्वी केल्याबद्दल आमदार परिचारक यांनी कारखान्याचे चेअरमन ,कार्यकारी संचालक,अधिकारी व सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.       
     प्रास्ताविक करीताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,युटोपियन च्या स्थापनेनंतरचा हा 4 गळीत हंगाम आहे. या गळीत हंगामा मध्ये कारखान्याने 147 दिवसअखेर 616025 मे.टन.ऊसाचे गाळप करीत सरासरी 10.76 च्या रिकव्हरी ने 6,60,000 किव्ण्टल साखर पोते उत्पादित केली आहेत. त्याच बरोबर 5 कोटी 13 लाख युनिट इतकी वीज निर्मिती करून 3 कोटी 46 लाख युनिट इतकी वीज निर्यात केली आहे. गतवर्षीपेक्षा कारखान्याची कामगिरी समाधानकारक आहेतसेच युटोपियन शुगर्स  सातत्याने नव-नवीन प्रयोग राबवित असून ऊस विकास परिषदेच्या माध्यमातून एकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी प्रयत्नशील आहे. तसेच भविष्यातही विविध सामाजिक उपक्रम राबवित सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लागेल असे काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. ऊस उत्पादकांनी टाकलेला विश्वास व कर्माच्यार्‍यांनी दिलेले महत्वाचे योगदान हीच युटोपियन शुगर्सची जमेची बाजू असल्याने कर्मचारी वर्ग यांना बक्षीस देण्याबाबत पांडुरंग परीवरचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक यांनी निर्णय घ्यावा त्यांचा शब्द प्रमाण समजून तितक्या दिवसाचा बक्षीस पगार आम्ही देणार आहोत.
       स्वागत करताना कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी कारखान्याच्या तांत्रिक बाबींचा आढावा घेत भविष्यातही  ऊस उत्पादकांना केंद्र स्थानी ठेवून कामकाज करणार असल्याचे मत व्यक्त करीत पुढील हंगामासाठी 725000 मे.टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवणार असून प्रतिदिनं 4500 मे.टन क्षमतेने कारखाना चालवणार आहे. व 30 केपीडी क्षमतेचा आसवाणी प्रकल्प ही उभा करणार असल्याचे सांगितले.
सदर प्रसंगी दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन चरणू काका पाटील व शिवाजीराव काळुंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
     प्रारंभी सत्यनारायणपुजा कारखान्याचे इलेक्ट्रिक इंजिनियर श्री प्रकाश सावंत व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शिल्पा सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आली तर चालू गळीत हंगामातील 655555 व्या साखर पोत्याचे पूजन आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या शुभ हस्ते करण्यात आली.   
सदरच्या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी,ऊस उत्पादक ,तोडणी ठेकेदार , कारखान्याचे सर्व खाते प्रमुख ,अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लक्ष्मण पांढरे यांनी मानले
फोटो ओळी :-  युटोपियन शुगर्स लि. पंतनगर कचरेवाडी गळीत हंगाम 2017-2018 सांगता सभारंभ प्रसंगी गव्हाणीत अखेरची मोळी टाकताना पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक,प्रभाकर परिचारक,आमदार प्रशांत परिचारक ,चेअरमन उमेश परिचारक कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील ,इलेक्ट्रिक इंजिनियर श्री प्रकाश सावंत व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शिल्पा सावंत,व विविध मान्यवर दिसत आहेत.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments