कॅन्सरवरील संशोधनाकरिता स्वेरीला आठ लाखांचा निधी....केंद्रीय मंत्रालयाकडून हिरवा कंदील!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 31 मार्च 2018


कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा सौ.वनिता जाधव, डॉ. सुलभ आपटे यांना डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी यांच्याकडून ‘डेव्हलपमेन्ट ऑफ अ कॅड सिस्टम्स फॉर द अर्ली डिटेक्शन ऑफ लंग कॅन्सर’ या विषयात संशोधनाकरीता आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे विभागप्रमुख प्रा सौ.वनिता जाधव, डॉ. सुलभ आपटे यांचा सत्कार करताना स्वेरीचे उपाध्यक्ष आर. बी.रिसवडकर डावीकडून जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, डॉ. व्ही.जे कुलकर्णी, प्रा. जे.डी.बोकेफोडे, प्रा. पी.जी. गायकवाड, डॉ.सुलभा आपटे, प्रा. सौ.वनिता जाधव,  संस्थेचे उपाध्यक्ष आर. बी.रिसवडकर, डॉ. प्रशांत पवार,  विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त डी.एस. सालविठ्ठल.

पंढरपूर- ‘फुफ्फुसात होणारा कॅन्सर विकार हा लवकरात लवकर समजून येण्यासाठी यावर संगणकाच्या साह्याने संशोधन करण्यासाठी स्वेरीने प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाला नवी दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँन्ड टेक्नोलॉजी, गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांनी नुकताच हिरवा कंदील दाखविला असून त्यासाठी लागणारा आठ लाखांचा निधी मजूर केला आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

        कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा सौ.वनिता जाधव, डॉ. सुलभा आपटे यांना डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी यांच्याकडून ‘डेव्हलपमेन्ट ऑफ अ कॅड सिस्टम्स फॉर द अर्ली डिटेक्शन ऑफ लंग कॅन्सर’ या विषयात संशोधनाकरीता  आठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये इमेज प्रोसेसिंगच्या माध्यमातून लंग कॅन्सरच्या मेडिकल इमेजेसद्वारे कॉम्प्यूटर एडेड डिझाईनचा वापर करून पहिल्या टप्प्यात असणारा कॅन्सर शोधण्यास मदत करणारे अल्गोरिदम तयार करण्यात येणार आहे. याकरिता कॉम्प्यूटर क्षेत्रातील विविध आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या संशोधनाचा पुढे भारत सरकारच्या फोल्डस्कोप फॉर सायन्स अँन्ड टेक्नोलॉजी या मिशन मध्येही सहभाग दर्शविला जाणार आहे. मनु प्रकाश यांनी फोल्डस्कोप हा जगातला सर्वात स्वस्त पेपर मायक्रोस्कोप बनविला असून या योजनेअंतर्गत ह्या मायक्रोस्कोपचा उपयोग हा सर्व शाळांतील मुलांना जीवशास्त्राकडे मुलांचे आकर्षण वाढविण्याकरिता होणार आहे.

             स्वेरी आता तंत्रशिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करत असून स्वेरीने नवनवीन संशोधन करत ग्रामीण भागात संशोधनाचे वातावरण तयार केले आहे. यापूर्वी डॉ. प्रशांत पवार यांनी संशोधन विभागाचा चार्ज घेतल्यापासून, मागील दहा वर्षात औद्योगिक चेन मधील बिघाड कमी करण्यासाठी त्याच्या उत्पादन पद्धतीत सुधारणा करणे, रुरल ह्युमन अँन्ड रिसोर्स डेव्हलपमेन्ट फॅसिलिटी मधून निसर्गऋण (बायोगॅस), माती परीक्षण, बी- बियाणे तयार करणे, मध्यम क्षमता हवामान केंद्र, सौरउर्जा, ग्रामीण भागासाठी जनावरांच्या प्रजननावर संशोधन करणे, जलशुद्धीकरण संयंत्र , लेजर द्वारे जमिनीचे सपाटीकरण करण्याकरीता लागणारी उपकरणे विकसित करणे, हेलिकॉप्टरच्या कम्पोझिट ब्लेडमध्ये झालेल्या बिघाडांचा शोध घेण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेसंदर्भातील संशोधन या व असे विविध प्रकारचे संशोधन केले आहे. यासाठी गेल्या दहा वर्षात संशोधनासाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय, भाभा संशोधन केंद्र मुंबई, राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नालॉजी कमीशनमहाराष्ट्र शासनमुंबई, राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्स टेक्नालॉजी इंदौर यांच्याकडून जवळपास साडेपाच कोटीपर्यंतचा निधी मिळविला आहे. यांच्याच अंतर्गत कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग विभागातर्फे  चळे, आंबे, पंढरपूर, कासेगाव व खर्डी येथील शाळा इंटरनेटच्या एक्सप्रेस वे मार्फत एकत्र जोडल्या असून त्यासाठी आकाश टॅब्लेटद्वारे वाय- फाय कनेक्टीव्हिटी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा वापर करून तेथील शाळांमधील मुलांना भारतातील कोणत्याही शाळेबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षण घेण्याची व संवाद साधण्याची संधी उपलब्ध केली आहे.

आता तंत्रशिक्षणाबरोबरच संशोधनात देखील स्वेरीने आघाडी घेतली आहे हे स्पष्ठ होते. आता या फुफ्फुसात होणारा कॅन्सरवरील संशोधनात ‘फ्लोडस्कोप’द्वारे कॅन्सर विकाराचा शोध घेणे सोपे होणार आहे. कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा. सौ.वनिता जाधव याना संशोधन करण्यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संशोधन विभागाचे प्रमुख डॉ.प्रशांत पवार, अधिष्ठाता डॉ. श्रीदेवी यांचे मार्गदर्शन मिळत असून डॉ.सुलभा आपटे, प्रा. पी.जी. गायकवाड व प्रा. जे.डी.बोकेफोडे हे संशोधक प्राध्यापक सहकार्य करत आहेत. हा संशोधन प्रकल्प निधी एक वर्षासाठी असून या संशोधनासाठी प्रा. सौ.वनिता जाधव यांचा संस्थेचे उपाध्यक्ष आर. बी.रिसवडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त विजय शेलार, माजी अध्यक्ष व विश्वस्त डी.एस. सालविठ्ठल, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त हनीफ शेख, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त एस.टी.राऊत, राजेंद्र आडमुठे, डॉ. व्ही.जे. कुलकर्णी, डॉ.व्ही एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते.  










पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments