लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 31 मार्च 2018
पंढरपूर नगरपरिदेने नगरपरिषद हद्दीत लगत असलेल्या टाकळी हद्दीतील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोई व्हावी म्हणुन सदरचे मालमत्ता धारक हद्दीबाहेर राहत असताना सुद्धा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला होता. परंतू त्या भागातील नागरिकांना वारंवार पाणीपट्टीची रक्कम भरण्याबाबत मागणी बिले,नोटिसा देऊन सुध्दा नागरिकांनी सुमारे नऊ लाख पन्नास हजार थकित पाणीपट्टीची रक्कम भरली नाही. तसेच स्पिकर द्वारे सदरची रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा खंडित केला जाईल. अशी सुचना देऊन सुद्धा पाणीपट्टीची रक्कम न भरल्याने याभागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
टाकळी हद्दीतील भागात नळ कनेक्शन देण्यास झाल्यास टाकळी ग्रामपंचायतीने नाहारकत दाखला दिल्यानंतरच नळ कनेक्शन दिले जाते म्हणुन नगरपरिषदेने टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांना सदरची थकबाकिची रक्कम रुपये साडेनऊ लाख रुपये भरण्याबाबत पत्र दिले असून ३१ मार्च २०१८ अखेर या भागातील पाणीपट्टीची संपुर्ण रक्कम जमा न झाल्यास भविष्यात या भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा कायम स्वरुपी बंद करण्याचा निर्णय नगरपरिषेदस घ्यावा लागेल असे पत्र मु्ख्याधिकारी अभिजीत बापट यांनी देऊन सुध्दा त्याभागातील नागरिकांनी व ग्रामपंचायतीने पाणीपट्टीची रक्कम न भरल्याने या टाकळी हद्दीतील संपुर्ण पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेऊन त्याभागातील संपुर्ण पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तरी याभागातील नागरिकांनी आपली पाणीपट्टीची रक्कम भरुन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवहान मुख्याधिकारी अभिजीत बापट व नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी केले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments