दि. 11 एप्रिल 2018 रोजी, रखुमाई पोलिस संकुल सभागृह, शहर पोलिस स्टेशन समोर, पंढरपूर येथे दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत
पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन आयोजित
"राज्यस्तरी पंढरी गौरव" पुरस्कार वितरण सोहळा
पंढरपूर लाईव्ह चा 4 था वर्धापन दिन समारंभ यानिमित्त संगीत, नृत्य, गायन, मनोरंजनाची पर्वणी! सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
पंढरपूर दि.06 :- आगामी काळात जयंती –उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सामाजिक सलोखा जपत शांततेत साजरे करावेत असे आवाहन तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इतर सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे, नायब तहसिदार एस.पी.तिटकारे, बांधकाम विभागाचे उपअभियंता हनुमंत बागल यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तहसिलदार मधुसूदन बर्गे बोलताना म्हणाले, विविध जयंती उत्सवाच्या निमित्ताने मिरवणुकांचे तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हे कार्यक्रम शांतेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवावा.संबंधित विभागांनी सेवा-सुविधा तत्परतेने पुरवाव्यात. या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहिल याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी. सार्वजनीक बांधकाम विगाभाने मिरवणुकीच्या मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्याबरोबरच व अडथळे दुर करावेत. मिरवणुकीत वापरण्यात येणा-या वाहनांची तांत्रिक तपासणी करावी असे सांगून या काळात शांतता व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा कायम राहावा असे आवाहन तहसिलदार बर्गे यांनी केले
तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले, जयंती-उत्सवाच्या कालावधीत नागरीकांमध्ये समन्वय राखणे गरजेचे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी ग्रामपातळीवर बैठकीचे आयोजन केले आहे. सर्वांनीच एकमेकांच्या भावनांचा आदर करत जयंती-उत्सव उत्साहात व आनंदात साजरी करावी. असे सांगून पोलीस विभागामार्फत केलेल्या नियोजनाची माहिती दिली व जयंती उत्सवाच्या कालावधीत नागरीकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले .
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments