पांगरीजवळ भीषण अपघात ; चार ठार एक गंभीर

दि. 11 एप्रिल 2018 रोजी, रखुमाई पोलिस संकुल सभागृह, शहर पोलिस स्टेशन समोर, पंढरपूर येथे दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत 

पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन आयोजित 

"राज्यस्तरी पंढरी गौरव" पुरस्कार वितरण सोहळा 

पंढरपूर लाईव्ह चा 4 था वर्धापन दिन समारंभ यानिमित्त संगीत, नृत्य, गायन, मनोरंजनाची पर्वणी! सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती.

पंढरपूर LIVE 6 एप्रिल 2018

महादेव गित्ते परळी : तालुक्यातील पांगरी जवळ अ‍ॅपेरिक्षा आणि ट्रव्हल्सच्या समोरासमोरील भीषण अपघातामध्ये ४ युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. गुरूवारी मध्यरात्री हा अपघात झाला असून जखमी युवकाला उपचारासाठी लातूरकडे हलिवण्यात आले आहे. खासगी ट्रॅव्हल ही नांदेडहून पुण्याकडे निघाली होती तर अ‍ॅपेरिक्षा प्रवाशांना घेऊन पांगरीहून परळीकडे माार्गस्थ होत असताना पांगरी कॅम्पजवळील जुना राजपूत ढाबा येथे ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये पांगरी गावातीलच बन्सी रामभऊ पाचांगे (२४), श्रावण नागोराव पाचांगे (२०), सुशील उत्तम पाचांगे (२१), प्रकाश विलास पंडित (२१) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. यापैकी बन्सी रामभाऊ पाचांगे यांचाच व्हिलेज झाला असून त्यांना १ मुलगा आहे. कामानिमित्ताने हे सर्वजन परळीकडे जात असताना काळाने घाला घातला. तर गंगाधर अशोक पाचांगे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने पांगरी गावात शोककळा पसरली आहे.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments