बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेची काटेकोर अंमबजावणी करा ! कामगार संघर्ष समितीच्या वतीने गटविकास अधिकार्‍यांना निवेदन.

दि. 11 एप्रिल 2018 रोजी, रखुमाई पोलिस संकुल सभागृह, शहर पोलिस स्टेशन समोर, पंढरपूर येथे दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत 

पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन आयोजित 

"राज्यस्तरी पंढरी गौरव" पुरस्कार वितरण सोहळा 

पंढरपूर लाईव्ह चा 4 था वर्धापन दिन समारंभ यानिमित्त संगीत, नृत्य, गायन, मनोरंजनाची पर्वणी! सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती.


पंढरपूर LIVE 6 एप्रिल 2018

पंढरपूर तालुक्यात हजारोंच्या संख्येने बांधकाम कामगार बांधकाम क्षेत्रात काम करुन आपला उदरनिर्वाह करीत आहेत.या कामगारांसाठी राज्य शासनाने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे.मात्र अधिकृत नोंदणीकृत कामगारांनाच या मंडळाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ मिळत असतो. या बांधकाम कामगारांची नोंदणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे.मात्र नोंदणीसाठी ग्रामसेवकांकडून योग्य माहीती दिली जात नाही व गांभियाने कामगारांची नोंदणी प्रक्रिया पार पाडली जात नसल्याचे दिसून येत आहे.या बाबत तातडीने योग्य ती कार्यवाही केली जावी अशी मागणी बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

          या बाबत अधिक माहीती देताना संघर्ष समितीचे अध्यक्ष समाधान रोकडे म्हणाले की,सह.कामगार आयुक्त कार्यालय सोलापूर व पंढरपूर पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामसेवकांची बैठक आयोजीत करुन बांधकाम कामगारांच्या नोंदणीबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे.अशा स्वरुपाच्या बैठका सन 2017-18 मध्ये जिल्ह्यातील अनेक तालुक्यात आयोजीत करण्यात आल्या होत्या.मात्र पंढरपूर पंचायत समितीच्या माध्यमातून अशा स्वरुपाची बैठकच अजून घेण्यात आलेली नाही.तरी याबाबत त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्हास पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन  करावे लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
      हे निवेदन देताना महिला कॉग्रेस कमेटीच्या तालुका अध्यक्षा राजश्री लोळगे,कॉग्रेस आय ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर कोळी,सुभाष गायकवाड,अमृता अष्टेकर,लखन वाघमारे,सोमनाथ कोळी आदी उपस्थित होते.







पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments