पंढरपूर LIVE 18 एप्रिल 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील रखुमाई पोलिस संकुल सभागृहात दि. 11 एप्रिल 2019 रोजी दुपारी 5 ते 10 वाजेपर्यंत संपन्न झालेल्या या समारंभाला पंढरपूरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, महिला काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.सौ.सुनेत्राताई पवार, राष्ट्रवादी चे प्रांतिक सदस्य मा.राजुबापु पाटील, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष मा.कल्याणराव काळे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रमुख डॉ.बी.पी. रोंगे, प्रांताधिकारी सचिन ढोले, डी.वाय.एस.पी. निखील पिंगळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नगरसेविका सौ. सुजाताताई महाजन-बडवे, नगरसेविका सौ. भाग्यश्री शिंदे, काँग्रेस आयच्या पंढरपूर तालुका उपाध्यक्षा सौ. रेखा विजयकुमार गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या सौ.रत्नप्रभा पाटील, नगरसेवक संजय निंबाळकर, नगरसेवक अमरसिंह परदेशी, नगरसेवक डी. राज सर्वगोड, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, अंबादास वायदंडे, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, समाजसेवक धर्मराज घोडके, नवनाथ रानगट, सुप्रसिध्द उद्योजक कांतीलाल सुपेकर, चंदुलाल सुपेकर, सुप्रसिध्द बासरी वादक नंदकुमार डिंगरे, सुप्रसिध्द तबला वादक सुशील कुलकर्णी, प्रसाद खाडिलकर, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा वाघमारे, पत्रकार नवनाथ पोरे, श्रीकांत कसबे, सुर्यवंशी, भारत पाटील, शरद रोंगे-पाटील, अपराजित सर्वगोड, निशीकांत पुणेकर, उमेश झाडे यांचेसह पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व अनेक पंढरपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. श्रीविठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. राजमाता जिजाऊ व क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्वांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले.
पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन संस्थापक चे अध्यक्ष तथा पंढरपूर लाईव्ह चे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी प्रास्ताविक केले. पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन ची स्थापना करण्यामागचं उद्दीष्ट सांगताना भगवान वानखेडे म्हणाले की,
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष लोटली परंतु या देशातील सर्वसामान्य घटकातील अनेकजण अद्यापही दारिद्याचं लाजीरवाणं जीणं जगताना आढळत आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य रयत गांजलेलीच आहे. क्रांतीसुर्य महात्मा फुले, राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अपेक्षीत असलेल्या सर्वांगीन विकासापासून या पुरोगामी महाराष्ट्रातील गोरगरीब जनता वंचीतच आहे. आजही माझ्या अनेक माताभगिणी मोलमजुरी करुन कसाबसा आपल्या संसाराचा गाडा हाकताना आढळून येतात. पतीची कमाई त्याच्या व्यसनातच संपते, पोटच्या लेकरांना पोटभर अन्न मिळावे व अंगभर कपडा-लत्ता मिळावा या माफक अपेक्षेने अनेक माता-भगिणी धुणीभांडी, शेतमजुरी, अशी अंगमेहनतीची कामे करुन आपला चरितार्थ चालविणार्या या माताभगिणींच्या मनात असूनही त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देता येत नाही. अशा मुलांना लहाणपणापासून हॉटेलमध्ये कामाला लावले जाते, पंढरीतील महाद्वारात अनेक मुलं भाविकांना चंदन लावताना आढळतात. वारीच्या काळात अशी अनेक लहान मुलं पडेल ती कामे करताना आढळतात. अशा मुलांना शिक्षणापासून वंचीत रहावं लागतं. अवघं बालपण कोमेजून जातं, तरुणपणी हीच मुलं अवैध व्यावसायिकांच्या जाळ्यात अडकतात, व्यसनाधीन बनतात व अशा पध्दतीने कित्येकांच्या पिढ्यानपिढ्या अशाच दारिद्रयाच्या, गुन्हेगारीच्या खाईत लोटल्या जातात. हे चित्र बदलायचं असेल तर सर्वप्रथम अशा गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आम्ही पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून अशा कांही मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांना विकसनशील समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आज पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनच्या या पहिल्या-वहिल्या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दैदिप्यमान कार्य केलेल्या परंतु सन्मानापासून वंचीत असलेल्या गुणवान मंडळींना आम्ही ‘पंढरी गौरव’ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत करत आहोत. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की, पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनच्या विधायक कार्यात आपण सर्वांनी सहभागी होऊन यथाशक्ती सहकार्य करावे.
यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनच्या कार्याचे कौतुक करत पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनच्या सर्व उपक्रमासाठी आवश्यक ते सहकार्य करु! अशी ग्वाही दिली.
उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष भगवान वानखेडे, सचिव विजयकुमार गायकवाड, खजिनदार जयंत नायकुडे सर, सदस्य धनंजय गावंधरे, सचिन सुरवसे, प्रदीप पांढरे सर, समाधान ताड आदींनी केला.
या समारंभाच्या औचित्याने पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक तथा पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भगवान वानखेडे यांचे मातापिता सौ. रुक्मिणीदेवी गणपतराव वानखेडे व श्री.गणपतराव शंकरराव वानखेडे यांचा विशेष सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान प्रभात फिल्म अॅकॅडमी, इंदापूर प्रस्तुत भुपाळी ते भैरवी हा बहारदार नृत्य, संगीत मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशनचे सचिव विजयकुमार गायकवाड व खजिनदार जयंत नायकुडे सर यांचे विशेष योगदान लाभले. तर प्रभात फिल्म अकॅडमी, इंदापूरचे संचालक तथा चित्रपट अभिनेते दिग्दर्शक शिवकुमार गुणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी सादर केलेल्या दिलखेचक नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. कु. विनया उत्पात यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन केले.
सुनील गोरे, पुणे (समाजरत्न पुरस्कार), शिवाजीराव पवार,मंगळवेढा, जि.सोलापूर (समाजभुषण पुरस्कार), शहाजी पाटील, शेटफळ नागोबाचे, ता.करमाळा, जि.सोलापूर (कृषीभुषण पुरस्कार), अविनाश कुटे-पाटील, नेवासा, जि.अहमदनगर (कृषीमित्र पुरस्कार), गोपाळराव देशमुख, पंढरपूर, जि.सोलापूर (साहित्यरत्न पुरस्कार), जयंत नायकुडे सर (जय इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग स्कुल), इंदापूर, जि.पुणे (शिक्षणरत्न पुरस्कार), पंढरपूर ब्लड बँक (उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पंढरी गौरव पुरस्कार), प्रमोद जगदाळे (सोलापूर जिल्हा संघटक संभाजी ब्रिगेड) तावशी, ता.पंढरपूर, विशेष गुणगौरव पुरस्कार, श्री.शिवकुमार गुणवरे,मराठी चित्रपट दिग्दर्शक व अभिनेता, इंदापूर, जि.पुणे (कलारत्न पुरस्कार), श्रीकांत साबळे, संपादकीय विभाग प्रमुख, दै.पुढारी सोलापूर (आदर्श पत्रकारिता पुरस्कार, मराठी माध्यम), श्रीनिवास देशपांडे, करस्पॉन्डन्ट अॅट हिंदुस्तान टाईम्स, पुणे (आदर्श पत्रकारिता पुरस्कार, इंग्रजी माध्यम), श्री.अरुण मेणकुदळे, श्रीसमर्थ स्कीन केअर लेसर सेंटर (जीवनगौरव पुरस्कार), डॉ.आनंदराव गायकवाड, पंढरपूर (समाजगौरव पुरस्कार), विलास साळुंखे, पंढरपूर, जि.सोलापूर (उत्कृष्ट सेवाभावी फोटोग्राफर), उमेश टोमके, पंढरपूर, जि.सोलापूर (कुशल प्रेस फोटोग्राफर), चि. महेश संजय फाटे (बेस्ट अॅथलेटीक्स), गार्डी,ता.पंढरपूर (क्रीडारत्न पुरस्कार), प्रा.सौ.सविता डी. उपल्ली (उच्चशिक्षीत महिला) पंढरपूर, विशेष गुणगौरव पुरस्कार, कु. विनया उत्पात (उत्कृष्ट निवेदिका) पंढरपूर, विशेष गुणगौरव पुरस्कार, सौ. किशोरी विष्णु अंकुशराव (उत्कृष्ट महिला संघटक) टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, विशेष गुणगौरव पुरस्कार, कु.डॉ.पल्लवी चांगदेव पाटील (उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगणा ) पंढरपूर,विशेष गुणगौरव पुरस्कार, सुभाष काकडे (कुशल कृषी औजार निर्माते) तांदुळवाडी अकलुज, विशेष गुणगौरव पुरस्कार, दिलीप आसबे (वैविध्यपुर्ण समाजकायर्र्), औरंगाबाद, विशेष गुणगौरव पुरस्कार, लक्ष्मीकांत खुळपे (शतकवीर रक्तदाता) पंढरपूर, विशेष गुणगौरव पुरस्कार, योगेश भीमराव लबडे (विशेष सामाजिक योगदान), धुळे, विशेष गुणगौरव पुरस्कार आदी मान्यवरांना ‘पंढरी गौरव राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments