श्री विठ्ठल इंजिनिअरींगमध्ये एमएचटी-सीईटी २०१८ च्या सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद सराव परीक्षेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर LIVE 16 एप्रिल 2018


पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये एमएचटी-सीईटी २०१८ या शासनाच्या येत्या १० मे २०१८ रोजी संपूर्ण राज्यभर होणार्‍या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर युवासेना व श्री विठ्ठल इंजिनिअरींग यांच्या संयुक्त विद्यमाने सराव परीक्षेचे (मॉक टेस्ट) आयोजन करण्यात आले होते. या सराव परीक्षेला सोलापूर जिल्ह्यासह सांगली सातारा ,उस्मानाबाद, व पुणे जिल्ह्यातील परीक्षार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर साडेचारशे परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली असली तरी त्यांच्या सोबत आलेल्या पालकांमुळे संपूर्ण कॉलेज कॅम्पस गजबजून गेला होता. स्वेरीने पालक व परीक्षार्थ्यांची जेवणासह संपूर्ण सोय केल्यामुळे परीक्षार्थी प्रचंड उत्साही दिसत होते.
          येत्या १० मे २०१८ रोजी संपूर्ण राज्यभर अभियांत्रिकी व फार्मसीच्या प्रवेशाकरीता अत्यंत महत्वपूर्ण समजली जाणारी शासकिय एमएचटी-सीईटी २०१८ ही परीक्षा होणार असून अभ्यासाची नेमकी पार्श्वभूमी लक्षात यावीपरीक्षा पध्दतीची योग्य माहिती होवून या परिक्षेचा अधिक सराव व्हावा याहेतूने १२ वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी सराव परीक्षा घेण्यात आली. यात फिजीक्सकेमेस्ट्रीमॅथॅमेटीक्स व बायोलॉजी या विषयांची परीक्षा घेतली.एमएचटी-सीईटी सराव परिक्षेचा निकाल प्रत्येक परीक्षार्थ्याला एस.एम. एस.द्वारे कळविण्यात आले. ही सराव परीक्षा विनामुल्य घेण्यात आली. स्वेरीने घेतलेल्या या सराव परीक्षेमुळे येत्या १० मे रोजी होणार्‍या शासनाच्या एमएचटी-सीईटी २०१८ ची परीक्षा आता सुलभपणे देण्यासाठी १२ वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.’ अशी अपेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांनी व्यक्त केली. ही सराव परिक्षा सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या चार जिल्ह्यातून जवळपास ४५० विद्यार्थ्यांनी दिली. युवासेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाघमारेपंढरपुरचे युवा अधिकारी प्रसाद सातपुतेदत्ता गोरे, सुभाष भोसले, वैभव ननवरे, स्वप्नील माने-देशमुख, सचिन बागल, अनिल निंबाळकर, युवासेनेचे पदाधिकारीस्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेप्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, इतर अधिष्ठाता, प्राद्यापकवर्ग हे परीक्षा सुरु असताना वर्गामधून अधून मधून पाहणी करत होते. यावेळी परीक्षार्थ्यांना दुपारच्या जेवणाची व आर ओ युक्त पिण्याच्या पाण्याची उत्तमरीत्या सोय करण्यात आली होती. परीक्षार्थ्यांना एसटी स्टँडपासून कॉलेजपर्यंत व परीक्षा संपल्यानंतर पुन्हा कॉलेजपासून एसटी स्टँडपर्यंत वाहतुकीची सोय केली होती. यावेळी संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता, विभागप्रमुखप्राध्यापकवर्ग तसेच फार्मसीमधील प्राध्यापक वर्ग या सराव परीक्षेचे उत्तम नियोजन केल्यामुळे एमएचटी-सीईटी सराव परीक्षा यशस्वीपणे पार पडली. परीक्षा संपल्यानंतर जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या परीक्षार्थ्यांनी सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांची प्रत्यक्ष भेट घेवून या परीक्षेचे आयोजन केल्यामुळे आम्ही आता येत्या १० मे रोजी होणार्‍या शासनाच्या एमएचटी.सीईटी २०१८ ही परीक्षा आत्मविश्वासाने देवू. याचबरोबर स्वेरीने घेतलेल्या  या सराव परीक्षेमुळे त्या’ परीक्षेचा अंदाज देखील आला व आमच्यातील आत्मविश्वास आणखी वाढला.’ अशी प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पसरल्याचे दिसून आले.  
छायाचित्र- श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात एमएचटी-सीईटी.ची सराव परीक्षा देताना विद्यार्थी व याची पाहणी करताना स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेयुवासेनेचे  सोलापूर जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाघमारे,प्रसाद सातपुते, युवासेनेचे पदाधिकारीस्वेरीचे प्राध्यापक वर्ग व आदी. 








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments