चिचूंबे येथील श्रीभैरवनाथ यात्रेनिमित्त आमदार भारतनाना भालके यांच्या शुभहस्ते गुणवंतांचा सत्कार

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 3 एप्रिल 2018
पंढरपूर ः दि.03 - पंढरपूर तालुक्यातील चिचुंबे येथे रविवार दि.01.04.2018 रोजी श्री भैरवनाथ यात्रा महोत्सव पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील आमदार श्री भारत भालके यांचे उपस्थितीत संपन्न झाला. 

          सदर यात्रेच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक श्री श्रीमंतभाऊ घुले तसेच कु.नम्रता दिगंबर घुले याची राष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धेत निवड झालेबद्दल आमदार श्री भालके यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. सदरवेळी श्री सचिन सुनिल घुले यांचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पंढरपूर तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल व पाणी व वीज प्रश्न आंदोलन केलेबद्दल श्री नितीन नागणे यांचाही सत्कार करण्यात आला.
           यावेळी बोलतांना आमदार श्री भारत भालके म्हणाले की, हे गांव छोटे असो या मोठे माझे मतदार संघातील असल्यामुळे माझे पूर्ण लक्ष या गांवावर आहे. कोणत्याही अडी-अडचणीचेवेळी गांवातील नागरिकांनी मला फोन  केला तर मी त्वरीत त्यांचे काम मार्गी लावतो. माझेही कुलदैवत भैरवनाथ असल्यामुळे माझ्यात व या गांवात साम्य असल्याचे भावनिक उद्गार आमदार श्री भालके यांनी काढले.
           प्रास्ताविकमध्ये बोलतांना श्री महादेव घुले सर म्हणाले की, आमदार श्री भारतनाना आमदार झाल्यापासून आमच्या गांवाची प्रगती झाली. लाईट, पाणी, रस्ते अशा मुलभूत सुविधा मिळाल्या. प्रथम स्वागत व सुत्र संचालन श्री संजय बाबुराव घुले यांनी केले.
सदरवेळी श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक श्री गोकुळदादा जाधव, श्री दिपकराव सदाबसे, सिध्देवाडीचे सरपंच श्री बाबासाहेब जाधव तसेच सर्वश्री दशरथआबा जाधव, बालाजी जाधव, गोरख बनसोडे, किसनराव घुले, विष्णु घुले, विक्रम घुले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
              कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री विठ्ठल शिखरे गुरूजी यांनी केले.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments