ग्रामीण भागातील मुलांना ज्ञानदानाने सक्षम बनवा मा. आ. सुधाकरपंत परिचारक यांचे प्रतिपादन

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 3 एप्रिल 2018

पंढरपूर  : हल्ली ग्रामीण भागात शिकवायचे म्हटले की सहसा कुणी तयार होत नाही. परंतु डॉ. सचिन लादेंसारख्या अभ्यासु प्राथमिक शिक्षकांनी ग्रामीण भागातील मुलांना आपल्या अनुभवी ज्ञानदानाने सक्षम बनवायला हवे, तरच ग्रामीण आणि शहरी असे अंतर दूर होऊन ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांची चांगली पिढी घडेल, असे प्रतिपादन मा.आ. सुधाकरपंत परिचारक यांनी व्यक्त केले.

डॉ. सचिन लादे यांना सोलापूर विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेल्या गौरव समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. प्रशांत परिचारक, ह.भ.प. श्री. वा.ना. उत्पात, नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे वा.गो. भाळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. लादे यांचा मा.आ. सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते शेला, पुष्पहार, मानपत्र देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला.

यावेळी आ. प्रशांत परिचारक, ह.भ.प. वा.ना. उत्पात, प्रताप चव्हाण, विनोद भरते, सुनिल कोरे आदींनी आपले मनोगत व्यक्तकेले.सत्काराला उत्तर देताना डॉ. सचिन लादे म्हणाले की, पीएच.डी. करण्याची प्रेरणा शिवराज पाटील-चाकोरकर यांच्या वक्तृत्वातून मिळाली. त्यामुळेच मी महाराजांवर संशोधन करायचे ठरविले. त्यासाठी अनेक स्थळांना भेटी दिल्या. समकालीन संतांचे ग्रंथ वाचले. कुटुंबियांच्या सहकार्यामुळे मी पीएच.डी. पूर्ण करू शकलो.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ गायकवाड यांनी केले, तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. मैत्रेयी केसकर आणि श्री. दीपक इरकल यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल कोरे, ज्ञानेश्वर मोरे, डॉ. बिभीषण रणदिवे, सोमनाथ गायकवाड, रवी सोनार, तुकाराम खंदाडे आणि मित्र परिवाराने परिश्रम घेतले.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments