पंढरपूर येथे आदर्श पोलीस व्यवस्था निर्माण करणार- विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे- पाटील

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 3 एप्रिल 2018
पंढरपूर दि.29 :- पंढरपूर ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी आहे. श्री विठ्ठल-दर्शनासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणा-या भाविकांना  आणि जनतेला पोलीस प्रशासनाकडून  सुरक्षेबाबतची चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, यासाठी आदर्श पोलीस व्यवस्था निमार्ण करणार असल्याचे  विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

पोलीस प्रशासनाच्या वतीने सिंहगड कॉलेज, कोर्टी ता.पंढरपूर येथे शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस  आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधना भोसले,  पोलीस अधिक्षक एस.वीरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, सहाय्यक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे उपस्थित होते.
पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले  पोलीस प्रशासन हे चांगली सेवा देणारे घटक बनविले जाईल. यासाठी आदर्श पोलीस व्यवस्था तयार करण्यास भर देण्यात येणार असून, पोलीस स्टेशनमध्ये कामांचे वर्गीकरण करुन रचनात्मक पध्दतीने काम करण्यास भर देण्यात येणार आहे. पंढरपूर ग्रामीणसाठी नवीन पोलीस स्टेशन प्रस्तावित असून हे पोलीस स्टेशन सर्व अत्याधुनिक सोयीयुक्त असणार आहे. पंढरपूर व बार्शी शहरासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पंढरपूरात येणा-या भाविकांना सुरक्षित वाटावे असे प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केले जातील असेही श्री.नांगरे पाटील यांनी यावेळी सांगितले.
पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, शहरात तसेच तालुक्यात अवैध वाळू व सावकारी मोठ्या प्रमाणात असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. यावर कडक कारवाई करण्यात येणार असून, आवश्यकता भासल्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच गुन्हेगारांना पाठींबा देणा-यांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हेगारांचे  दावे जलद न्यायालयात चालविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे  त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार भारत भालके म्हणाले शहरातील तसेच तालुक्यातील अवैध धंदे बंद होणे गरजेचे आहे. गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. तसेच गुन्हेगारांच्या बाबतीत राजकीय हस्तक्षेप करु नये असे सांगितले.  जिल्हा पोलीस अधिक्षक एस. वीरेश प्रभू म्हणाले, पंढरपूर शहराच्या सुरक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून, अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच  प्रशासकीय बाबींची पडताळणी करुन पंढरपूर तालुक्यात पोलीस औट पोष्ट निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नागरीकांनी अवैध धंद्ये व गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली.तसेच ग्रामीण भागात पोलीस औट पोष्ट निर्माण करण्याबाबत मागणी केली. या बैठकीस तालुका पोलीस निरिक्षक कृष्णदेव खराडे,  विठ्ठल दबडे, मान्यवर नागरीक, व्यापारी, विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments