डिप्लोमा इंजिनिअरिंगची श्रेया मोहोळकर राज्यात तिसरी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 3 एप्रिल 2018
पंढरपूर-महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबईने घेतलेल्या उन्हाळी परीक्षेत स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमधील कु. श्रेया विक्रम मोहोळकर या विद्यार्थीनीने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक मिळविला असून पंढरपूर पंचक्रोशीत श्रेया मोहोळकर यांचे कौतुक होत आहे.

          स्वेरी अंतर्गत असलेल्या पदवी अभियांत्रिकीच्या ‘पंढरपूर पॅटर्न’नुसार डिप्लोमा इंजिनिअरिंगने देखील आपली शैक्षणिक वाटचाल सुरु केली असून प्रत्येक वर्षी विक्रमांचे विक्रम मोडीत निघून नवीन विक्रम स्थापन होत आहे. राज्यभर स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकीचा विजयी पताका डौलाने मिरवत असतानाच डिप्लोमा देखील मागे नाही हेच प्रत्येक वर्षीच्या वार्षिक निकाल व त्यात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत होणारी वाढ यावरून समजून येते. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून उतीर्ण झालेल्या श्रेया मोहोळकर यांना एम.एस.बी.टी.ई मुंबईकडून राज्यात तिसरा क्रमांक आल्याचे प्रमाणपत्र व रोख दोन हजार रुपये देवून गौरविण्यात आले. मोहोळकर यांना डिप्लोमाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम परीक्षेत ९५.५३ टक्के गुण मिळवत राज्यात तिसरा क्रमांक मिळविला. त्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व पदवी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी.रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी, विश्वस्त, प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, विभागप्रमुख प्रा. एच.डी. कोरडे, मार्गदर्शन करणारे प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले. स्वेरीच्या स्थापनेनंतर  पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांकडून ‘स्वेरीने आता डिप्लोमा इंजिनिअरिंगदेखील सुरु करावे’ अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे सन २००८-०९ साली डिप्लोमाची पाच विभागासह स्थापना झाली. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वेरीच्या माध्यमातून मिळणारे यश पाहून पालकांची अपेक्षा आणखी वाढली आणि पदवी अभियांत्रिकीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाची मागणी करण्यात आली.त्यानुसार खास लोक आग्रहास्तव संस्थेने देखील प्रस्ताव पाठविला असून लवकरच पदवी अभियांत्रिकीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाची सुरवात होत असल्याचे सांगण्यात आले.आता सर्व विभागाबरोबरच पदवी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याकरता डिप्लोमा इलेक्ट्रिकल उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इतरत्र कोठेही जावे लागणार नाही हे मात्र निश्चित.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments