लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने माहिती शिक्षण प्रचार (IEC) संपुर्ण शहरात तसेच उपनगरात घरोघरी सर्वेक्षण, जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली असुन त्याची सुरुवात प्रभाग क्र.४ येथुन आरोग्य समिती सभापती अनुसया शिरसट यांचे शुभहस्ते, विक्रम शिरसट यांचे प्रमुख उपस्थितीत सुरु करण्यात आलेली आहे. यामध्ये श्रीयशराज एंटरप्राईझेसचे विशाल जपे यांच्या संस्थेमार्फत मोहिम राबविली जात आहे. यामध्ये नागरीकांना ओला व सुका कचरा विलगीकरण, घंटागाडी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टीक बंदी, पर्यावरण पुरक वस्तुंचा वापर इ. जनजागृती करण्यात येत आहे. सदरचा सर्व्हे महिला कर्मचा-यांमार्फत केला जाणार आहे. यावेळी श्रीयशराज एंटरप्राईझेसचे प्रकल्प समन्वयक दिगंबर कुलकर्णी, पंढरपूर नगरपरिषदेचे नागनाथ तोडकर, भारत माने, विठ्ठल साळुंखे, दत्तोपंत कोळी, किशोर दंदाडे, अंकुश घनवजीर, आप्पा माने, लखन माने हे उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments