लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 2 एप्रिल 2018
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील आमदार श्री भारत भालके यांचे आमदार फंडातून पंढरपूर शहरातील 1) शासकीय वसाहत, के.बी.पी.कॉलेजच्या मागे, 2) श्रीकृष्णाच्या हौदाजवळ, बाजारपेठ व 3) सोन्या मारूती मंदिराजवळ, दाळे गल्ली येथे हायमॉस्ट लॅम्पचे शनिवार दि.31.03.2018 रोजी सायंकाळी उद्घाटन झाले.
पंढरपूर शहरातील नागरीकांकडून वारंवार हायमॉस्ट लॅम्पची मागणी होत असल्यामुळे त्यांची मागणीची दखल घेऊन आमदार श्री भारत भालके यांनी आमदार फंडातून सदर ठिकाणी हायमॉस्ट लॅम्पसाठी एकूण रू.6.35 लाख निधी उपलब्ध करून दिला. तसेच पंढरपूर शहरामध्ये आणखी बर्याचठिकाणी हायमॉस्ट लॅम्पससह इतर विकास कामांसाठी निधी दिलेला असून त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत.
यावेळी बोलतांना आमदार श्री भारत भालके म्हणाले की, पंढरपूर शहरामध्ये नगरपालिकेच्या रिकाम्या जागेवर वॉकिंग ट्रॅक, व्यायामशाळा तसेच ज्येष्ठ नागरीकांना बसण्यासाठी बाकडी देणेकामी नगरसेवकांना सूचना केल्या. शासकीय वसाहतीमध्ये उद्घाटन प्रसंगी नगरसेवक श्री सुधीर धोत्रे, श्री महादेव धोत्रे, नगरसेविका सौ.सारिका साबळे, श्री प्रशांत शिंदे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्री सुधीर भोसले तसेच सर्वश्री संजय बंदपट्टे, दत्ता भोसले, सुभाष हुंगे-पाटील, संतोष धोत्रे, राजाभाऊ भोसले, यांचेसह स्थानिक नागरीक उपस्थित होते.तसेच श्रीकृष्णाच्या हौदाजवळील बाजार पेठेतील हायमॉस्ट लॅम्पच्या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक श्री निलेश आंबरे, श्री सुधीर धोत्रे, श्री महादेव धोत्रे, तसेच संजय भिंगे, बालाजी कवठेकर, महंमद उस्ताद मेंबर, मुकूंद मर्दा, संतोष भिंगे, भगिरथ म्हमाने, प्रदीप फडे, सचिन म्हमाने, सदानंद सुपेकर, राजकुमार गांधी, संजय बंदपट्टे, दत्ता भोसले, सुभाष हुंगे-पाटील, संतोष धोत्रे, राजाभाऊ भोसले यांचेसह स्थानिक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments