लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर तालुक्यातील तुंगतमध्ये दोन समाजात झेंड्यावरून वाद..!
गावात तणावपुर्ण शांतता... पोलिसांचा चोख बंदोबस्त!
पंढरपूर LIVE 2 एप्रिल 2018
पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे कमाणीवरील झेंड्यावरून दोन समाजात वाद निर्माण झाला होता. गावातील मुख्य वेशीवरील कमाणीवर भगव्या झेंड्याच्या शेजारी काल रात्री कुणीतरी निळा झेंडा लावला. सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर हा झेंडा काढुन टाकण्याची मागणी गावातील मराठा समाजाने लावुन धरत रास्ता रोको आंदोलन केले.
निळा झेंडा काढायचा असेल तर भगवा झेंडाही काढुन टाका. अशी मागणी दलित समाजाने लावुन धरली होती. गावात दोन समाजात यामुळे तणाव निर्माण झाल्याने गावातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली होती. याची माहिती मिळताच अॅडीशनल एस.पी. जाधव व डी.वाय.एस.पी. निखिल पिंगळे तसेच पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. खराडे आदी तातडीने तुंगत गावात दाखल झाले. गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
तहसिलदार बर्गे व पोलिस अधिकार्यांच्या उपस्थितीत ग्रामसेवकांनी निळा व भगवा झेंडा कमाणीवरून काढला.
पोलिस बंदोबस्तात तहसिलदारांच्या उपस्थितीत दोन्ही झेंडे काढल्यानंतर काही तरूणांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा असून गावात तणावपुर्ण शांतता आहे.
झेंड्याचा वाद आणि दुभंगलेली मनं...
सकाळी 8 ते दुपारी दोन वाजेपर्यंत निळा आणि भगवा हे दोन्ही झेंडे कमाणीवर एकमेकांच्या शेजारी फडकत होती. पण एकाच गावातील दोन समाजमनं मात्र यामुळे दुभंगलेली दिसून येत होती.
भगवा झेंडा कमाणीवर लावण्याचा ठराव ग्रामसभेत झाल्याने कमाणीवर भगवाच फडकायला हवा! असं एका समाजाचं म्हणणंय तर, कमाणीवर भगवा झेंडा लावला तर शेजारी निळा झेंडाही लावला जावा. अशी दुसर्या समाजाची मागणीय. याआधीही तुंगतमध्ये दोन समाजात संघर्ष घडलाय. गावातील तब्बल 100 जणांवर यापूर्वी अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल झालेले होते. तुंगत गावातील दलित सवर्णातील वारंवार होणारा हा संघर्ष नेमका कशामुळे होतोय? याबाबत सखोल तपास होणं गरजेचं वाटतं.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments