पंढरपूरकरांशी सुसंवाद साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा विश्वास सर्वसामान्यांना देणार आज आय.जी विश्वास नांगरे- पाटील

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूरकरांशी सुसंवाद साधून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा विश्वास सर्वसामान्यांना देणार आज आय.जी  विश्वास नांगरे पाटील 


पंढरपूर LIVE 1 एप्रिल 2018

गेल्या 11 महिन्यात भुवैकुंठ पंढरीतील तिघांचे खुन झाल्याने भयभीत झालेल्या पंढरपूरकरांना विठोबाच्या या पावन नगरीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा विश्वास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक  (आय.जी.) श्री. विश्वास नांगरे पाटील आज देणार आहेत.

बर्‍याच दिवसांपासून पंढरपूरमध्ये नांगरे पाटलांनी येवून येथील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आढावा घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. अशी येथील नागरिकाःची ईच्छा होती. आज रविवारी दुपारी 12 वाजता पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातील भेटीनंतर सिंहगड काॅलेज, कोर्टी येथे नांगरे पाटील स्वतः येथील व्यापारी, पत्रकार, नगरसेवक  व सर्वसामान्य नागरिकांशी सुसंवाद साधणार असल्याने पंढरपूरकरांना दिलासा मिळाला आहे.

आज दुपारी 12 वाजता कोर्टी रोडवरील सिंहगड काॅलेज येथे नांगरे पाटील जनतेशी सुसंवाद साधून नागरिकांना भयमुक्त वावरण्यासाठीचा विश्वास व्यक्त करणार आहेत.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments