लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 31 मार्च 2018
खर्डी (संतोष कांबळे):- पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली.रामनवमी ते हनुमान जयंती असे नामसप्ताहाचे आयोजन केले जाते. गावातील हनुमान मंदिरात हरिनाम सप्ताहाचे नियोजन करण्यात आले होते.
सकाळी सूर्योदयाला सहा पस्तीस वाजता पुष्पवर्षाव करण्यात आला.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती वेळी प्रवचन ह.भ.प.धंनजय गुरव(धोंडेवाडी)यांचे काल्याचे कीर्तन झाले.
पंचक्रोशीतून हजारो भाविक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बाळासो मोकाशी,किरण मोकाशी, अभिजित मोकाशी, राजू मोकाशी, बापूसो केसकर, रामदास रोंगे, जगन्नाथ बनसोडे आदींनी परिश्रम घेतले. रात्री छबिना काढण्यात आला. यावेळी सरपंच रमेश हाके, उपसरपंच प्रणव परिचारक, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments