सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील पाच तालुक्यांची निवड

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 5 एप्रिल 2018


परळी वैजनाथ / महादेव गित्ते
       सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातील पाच तालुक्याची निवड झाली असुन परळी तालुक्यातील 84गावापैकी60 गावानीं यात भाग घेवुन स्पर्धे अगोदरचे प्रशिक्षण घेवुन गाव पाणीदार करणेसाठी 299जलनायकांची फौज सज्ज झाली असुन या टिम मध्ये 80महिला असुन पुरूषांची सख्या 219 आहेत.
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन हे आपल्या परिने अनेक कामे करीत असुन सामाजिक भावनेतुन दुष्काळाला हरविण्यासाठी व अशी गावे पाणीदार करण्यासाठी सिने अभिनेते अमिरखान व त्यांचे मित्र किरणराव यांनी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या वतीने वाँटर कप स्पर्धेची कल्पना नुसती मांडली नसुन गेल्या वर्षी अमलात आनुन यशस्वी करून  दाखवली. त्यावेळी अनेक गावांनी यात सहभाग घेवुन गावे पाणीदार केली अनेक गावांनी बक्षिसेही पटकावली.
या वर्षीसुध्दा वाँटर कप स्पर्धा ठेवण्यात आल्या असुन या स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याची निवड करण्यात आली असुन जिल्ह्यातील पाच तालुके निवडण्यात आले आहे.यात परळी तालुक्याचा समावेश असुन तालुक्यातील 84 गावापैकी 60 गावांनी या स्पर्धेत भाग घेतला असुन स्पर्धेपुर्वीचे देण्यात येणारे प्रशिक्षण लातुर जिल्ह्यातील तालुका औसातील गेल्या वर्षी वाँटर कप स्पर्धेत तालुका पातळीवरचे प्रथम दहा लाखाचे तर मुख्यमंत्रीचे आठ लाखाचे बक्षिस मिळवलेल्या दावतपुर या गावात जावुन घेवुन आपली गावे पाणीदार करण्यासाठी 299 जलनायकांची फौज सज्ज असुन या टिम मध्ये 80 महिलांनी हिरीरीने भाग घेतला आहे. वाँटर कप स्पर्धेची सुरूवात 8एप्रिल पासुन सुरू होणार असुन  तालुक्यातील 60 गावातील प्रशिक्षीत जलनायक व गावकरी स्पर्धेची कोणकोणती कामे करायची आहेत या साठी दररोज शिवार फेरी काढुन कामाची आखणी करण्यात दंग आहेत हि स्पर्धा यशस्वी करणेसाठी परळीचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, कृषी विभागाचे अधिकारी,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ,तलाठी, ग्रामसेवक व  पाणी फाऊडेशनचे मराठवाडा विभागीय समन्वयक संतोष शिनगारे,तालुका समन्वयक प्रशांत ईखे व रमेश शेप हे परिश्रम घेत आहे.

              
स्पर्धे पूर्वी करता येणारी कामे .

1) शोषखड्डे - 5 गुण 
2) रोपवाटिका /नर्सरी  -5 गुण 
3) माती परीक्षण -5 गुण 
4) आगपेटीमुक्त शिवार (कम्पोस्ट खड्डे किंवा ढीग - बयोडायनामीक खड्डे - नाडेप )- 5 गुण 
5) पाणी बचत तंत्रद्न्यान (ठिबकसिंचन -स्प्रिंकलर -मल्चिंग -बी बी एफ -बायोमास वापरून केलेले मल्चिंग ) - 5 गुण 
6) अस्तित्वात असलेल्या रचनांचे सर्वेक्षण पाहणी करून रिपोर्ट तयार करणे  - 3 गुण 
असे एकूण - 28 गुण स्पर्धे पूर्वी मिळवू शकतो ...
 *श्रमदान 20 

*यंत्रकाम 20

*कोणत्याही अस्तित्वात असलेल्या 2  जुन्या रचनांची दुरुस्ती - 7 

अथवा 

*  विहीर पुनर्भरण 

अथवा 

* नाविन्यपूर्ण उपक्रम


शेवटच्या मुद्द्याला हे 2 मुद्दे   *or* आहेत.

 25  गुणासाठी काहीही करायचे नाही
या मध्ये 
संपूर्ण स्पर्धेची कामे गुणवत्तापूर्ण असली पाहिजे.

गुणवत्ता  - 10 गुण
माथा ते पायथा - 10गुण
वॉटर बजेट - 5 गुण.
                




***सन्मानपत्र सह भरगच्च बक्षिसे***
वाँटर कप स्पर्धे मध्ये उत्क्रष्ट काम करणाय्रा गावांना राज्य पातळीवरचे प्रथम बक्षिस 75 लाख रूपये ठेवले   असुन दुसरे 50 लाख रू. तिसरे 40 लाख रू. तर तालुका पातळीवर सर्वोत्तम काम करणाय्रा गावांला 10लाखाचे बक्षिस व सन्मान पत्र देवुन गौरविण्यात येणार आहे स्पर्धेच्या काळात जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगीरी करणाय्रा गावाकरिता हि स्पर्धा असुन गावे पाणीदार होवुन टँकरमुक्त व्हावी हा सत्यमेव जयते वाँटर कप स्पर्धेचा उद्देश असुन हि कामे शासनाची यत्रंणा, सेवा भावी संस्था व लोकसहभागातुन होणार असुन परळी तालुक्यातील 60 गावांतील 299जलनायक व गावकरी आपल्या गावांत कोणकोणती कामे करावयाची याच्या नियोजनात व्यस्त झालेली दिसत आहे.







पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments