लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 5 एप्रिल 2018
पंढरपूर -पुणे येथील अॅडव्हान्सड रिसर्च सोसायटी फॉर सायन्स अॅण्ड सोशिओलॉजीने आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमधील स्पर्धेत स्वेरी अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारा विशाल विकास माने यांनी सादर केलेल्या संशोधन पेपरला सर्वोकृष्ट संशोधन पेपर म्हणून गौरविण्यात आले.
इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग (आयसीसीइइइ) या विषयावर भारतामधील विविध राज्यातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या संशोधन पेपर स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्वेरीच्या इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल माने यांनी ‘डोअर अॅटोमेशन अॅण्ड व्हिजिटर नोटीफिकेशन युजींग आयओटी’या विषयावर आपला संशोधन पेपर सादर केला होता तर याच विषयावर इतर ११ स्पर्धकांनी देखील संशोधन पेपर सादर केले होते. यावर सर्व स्पर्धकामधून परीक्षकांनी सादरीकरणाच्या निकषावरून विशाल माने यांच्या पेपरचा उत्कृष्ठ संशोधक पेपर म्हणून गौरव करून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून भारती विद्यापीठाचे प्रा. दीपक रॉय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशाल माने यांना संशोधन पेपर स्पर्धेत धनश्री मधुकर यादव यांचे सहकार्य लाभले. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, संस्थचे इतर पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य व उपप्राचार्य, संशोधनासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रेरणा देणारे संशोधक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, इतर अधिष्ठाता, इतर विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशाल माने यांचे अभिनंदन केले. स्वेरीतील संशोधनाचे वातावरण तयार झाल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील अभ्यासाबरोबरच संशोधन करण्याची अभ्यासूवृत्ती निर्माण झाली आहे.
छायाचित्र – स्पर्धेतील विजेता विशाल विकास माने व स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments