पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
पंढरपूर LIVE 15 एप्रिल 2018
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली, आमदार प्रशांतराव परिचारक, आमदार भारतनाना भालके, आमदार दत्तात्रय सावंत, पांडुरंग सह.सा.का. व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, सहा. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, तहसीलदार मधुसुदन बर्गे, पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, नगरसेवक सुजित सर्वगोड, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब देशमुख, पंचायत समिती उपसभापती अरुण घोलप, आरपीआय नेते जितेंद्र बनसोडे, सुनिल सर्वगोड, मुख्याधिकारी अभिजीत बापट, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्य घटना लिहीली आणि संपुर्ण देश एकसंघ राहिला पाहिजे ही सामाजिक समतेची शिकवण त्यांनी समाजाला दिली म्हणुन विविध जाती धर्माचे लोक आज एकत्रित रित्या एकसंघपणे या देशात राहतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हे दिलेले सुत्र सर्वांनी अंगीकरणे आवश्यक आहे. तसेच शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात समता सप्ताह साजरा करण्याबाबत सुचित केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असणा-या सर्व अधिका-यांनी शासनाच्या धोरणानुसार संपुर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये समता सप्ताह साजरा करावा असे सांगितले.
यावेळी नगरसेवक सुजित (राजु) सर्वगोड यांच्या सम्राट तरुण मंडळाच्यावतीने आलेल्या भिमज्योतीचे स्वागत आमदार प्रशांतराव परिचारक यांच्यावतीने करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सवाचे अध्यक्ष शिलरत्न झेंडे यांनी उपस्थित सर्व भिम सैनिकांचे व पदाधिका-यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, जि.प.सदस्य सुभाष माने, माजी पक्षनेते सचिन डांगे, नगरसेविका सुप्रिया डांगे, अनुसया शिरसट, रेणुका घोडके, शकुंतला नडगिरे, सुजाता बडवे, नगरसेवक विवेक परदेशी, विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, ऋषीकेश उत्पात, नरसिंह शिंगण, दत्तात्रय कवठेकर, इब्राहीम बोहरी, सुधीर धोत्रे, महादेव भालेराव, डी.राज. सर्वगोड, समाजसेवक नवनाथ रानगट, धर्मराज घोडके, बसवेश्वर देवमारे, नागेश यादव, किरण घाडगे, संतोष पवार, शंकर पवार, सचिन शिंदे, शैलेश बडवे, महेश साठे, जयंत भंडारे, पत्रकार सचिन कांबळे, रामभाऊ सरवदे, आप्पासाहेब जाधव, महादेव धोत्रे, रमेश कांबळे, सुरेश आगावणे, कृष्णा वाघमारे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी पत्रकार अभिराज उबाळे, शिलरत्न झेंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व समाज बांधव, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच माजी आमदार व कामगार नेते भाई राऊळ यांच्या पुण्यतिथी निमित्त वरील सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments