भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! जय भिम!
साखर व शेती उद्योगातील एक प्रयोगशील व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड...
नेवासे येथील कृषी व साखर क्षेत्रातील पितामह मनोहर कुटे-पाटील यांचे निधन...
पंढरपूर LIVE 14 एप्रिल 2018
साखर व शेती उद्योगातील एक प्रयोगशील व्यक्तीमत्व नेेेेवासे,
जि. अहमदनगर येथील कृषी व साखर क्षेत्रातील पितामह निलकंठ कुटे पाटील यांचे दि.14/4/18 रोजी दुपारी 4.5 मिनिटानी वयाच्या 67 वर्षी दुःखद निधन झाले.
अशोक साखर कारखाना अगर, पूर्णा साखर परभणी, श्री. संत तुकाराम सखार पुणे येथे रसायन विभागत ज्यूस सुपरवायझर म्हणुन त्यांनी काम केले होते. निवृत्तीनंतर जेंव्हा ते आपल्या गावी आले तेंव्हा स्वतःचे पिढीजात घर आणि स्वतःची जमीन ताब्यात घेण्यासाठी त्यांनी अविरत संघर्ष केला. माझ्या वडिलोपार्जित जमिनीचा ताबा मला मिळायलाच हवा! यासाठी सर्वप्रथम ते लढले, जिंकले. वडिलोपार्जित जमिनीला पाणीच उपलब्ध नसल्याने ती पडीक होती. त्या काळी त्यांनी डिझेल इंजिनवर शेतीला पाणी देण्याचा अभिनव प्रयोग सर्वप्रथम राबवला. व पडीक माळरानावर हिरवळ फुलवली. कुटे-पाटीलांनी अर्धांगिनीसोबत घाम गाळुन कमी पाण्यात व कमी क्षेत्रात भरघोष उत्पन्न कसे मिळवता येते हे दाखवून दिले. पुढे या शेतासाठी वीज मिळावी यासाठी त्यांनी खुप संघर्ष केला. बर्याच वर्षाच्या संघर्षानंतरही यात यश न आल्याने त्यांना तणावामुळे अर्धांगवायुचा झटका आला. ते कायमचे जायबंदी झाले.
पण वीज मिळवण्यासाठीचा माझा संघर्ष तू चालव असं स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला त्यांनी सुचवले. त्यांचे चिरंजीव म्हणजेच पंढरपूर सोशल फाऊंडेशन ने राज्यस्तरीय पंढरी गौरव कृषीमित्र पुरस्काराने सन्मानित केलेले अविनाश कुटे-पाटील यांनी वडिलांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानुन माहितीच्या अधिकाराखाली विद्युत वितरण कंपनीशी निकराचा लढा दिला. याला यश मिळाले. केवळ कुटे-पाटीलांच्याच नव्हे तर या परिसरातील अनेक शेतकऱ्यांना वीज मिळाली.
स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि लढताना हरलो तरी पुन्हा धडपडून उठत जोमानं संघर्ष करत यश मिळवावं लागतं असा संदेश देणारा हा कृषी व साखर क्षेत्रातील पितामह अनेकांना जगण्याची शिदोरी देऊन काळाच्या पडद्याआड गेला आहे. मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे.
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन चे सर्व सदस्य सहभागी आहेत.
जगतात सारेच...पण स्वतः जगताना आपला स्वाभिमान जपत इतरांच्या स्वाभिमानासाठी लढणारे स्व.कुटे-पाटील यांच्यासारखे खुप कमी असतात. ॥भावपुर्ण श्रध्दांजली॥
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments