पंढरीत मातृदिनानिमित्त आगळे वेगळे पुष्पाई भित्ती काव्यचित्र प्रदर्शन-2018 संपन्न! कवी रविराज सोनार व साहित्य वर्तुळचा अभिनव उपक्रम!

पंढरपूर LIVE 14 मे 2018












मातृप्रेम सर्वांनाच हवे-हवेसे” ह. भ. प. वा. ना. उत्पात


पंढरपूर  (प्रतिनिधी):- या सृष्टीमध्ये मातृप्रेम हे सर्वाधिक पवित्र असून ते सर्वजणांना हवेहवेसे वाटते” असे मत ह. भ. प. वा. ना. उत्पात यांनी व्यक्त केले. ते येथील पंढरपूर साहित्य वर्तुळ परीवाराच्या वतीने स्वर्गीय सौभाग्यवती पुष्पावती वसंत सोनार यांच्या स्मरणार्थ आणि मातृत्व दिवसाच्या औचित्याने भरविलेल्या पुष्पाई भित्तीकाव्यचित्र  प्रदर्शना” मध्ये बोलत होते. ते पुढे म्हणाले की केवळ माणसांनाच नव्हे तर साक्षात परमेश्वरालाही मातृप्रेम हवेहवेसे वाटते म्हणूनच परमेश्वरानेही वेगवेगळे अवतार घेतले आणि मातृप्रेम प्राप्त केले.
          साहित्य वर्तुळ पंढरपूर परिवाराच्यावतीने या प्रसंगी सौ. सुवर्णाताई आप्पासाहेब चव्हाणसौ. द्वारकाबाई  वसंतराव लादेसौ. प्रभावती प्रभाकर वांगीकरसौ. पुष्पावती शिवदास भिंगे आणि सौ. उषाताई अरुणशेठ मंजरतकर या पाच आदर्श मातांचा मातृभक्त ह. भ. प. वा. ना. उत्पात यांच्या शुभहस्ते महावस्त्रपुष्पगुच्छसन्मानचिन्ह आणि ग्रंथ  देऊन सन्मान करण्यात आला. या पुष्पाई भित्तीकाव्यचित्र प्रदर्शन” मध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 'आई या विषयावरील पन्नास कवितांचे भित्तिचित्र तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये बारा वर्षाच्या कवयित्री पासून पंचाहत्तर वर्षांच्या कवीपर्यंत अबालवृद्धांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. सर्वच कविता आई या विषयावर असल्याने मातृप्रेम आणि मातृभक्ती हा आशय सर्व कवितांमधून वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आला होता. या पुष्पाई भित्तीकाव्यचित्र प्रदर्शनास” दिवसभरात जिल्ह्यातून वेगवेगळ्या क्षेत्रातील सुमारे पाचशे लोकांनी भेट दिली. आणि प्रदर्शनातील कवितांचे वाचन करताना वेगवेगळ्या क्षेत्रातील बहुसंख्य वाचकांचे व मातृभक्तांचे डोळे पाणावले तर काहीजण सद्गदित झाले. पंढरपूर साहित्य वर्तुळ च्या वतीने आयोजित करण्यात आलेले आईविषयक कवितांचे वेगवेगळ्या कवींचें हे आणि कवयित्रींचे हे भीतीकाव्यचित्र प्रदर्शन केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुधा पहिल्यांदाच होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. या प्रकारचे भित्तीकाव्यचित्र प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात व्हावे अशी अपेक्षा काही साहित्य रसिकांनी व्यक्त केली.  हे पुष्पाई भित्तीकाव्यचित्र प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी साहित्य वर्तुळ पंढरपुरचे संस्थापक अध्यक्ष विश्वविक्रमी कवी रवि वसंत सोनारप्राचार्य शिवाजीराव बागलसचिन कुलकर्णीदादासाहेब खरातसुजीतकुमार कांबळेराजेंद्र झुंबर भोसलेसंग्राम जाधववैभव कुलकर्णी या व इतर साहित्यिकांनी विशेष परिश्रम घेतले. साहित्य वर्तुळच्या या अनोख्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. या उपक्रमामुळे साहित्य क्षेत्रातील अनेक कवींना आईविषयी भावभावना व्यक्त करण्याची संधी मिळाली त्यामुळे साहित्य वर्तुळ परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments