पंढरपूर लाईव्ह कार्यालयात क्षात्रवीर स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी... डी.वाय.एस. पी. निखील पिंगळे व यु.पी.एस.सी. त नेत्रदिपक यश संपादन केलेले संतोष माळी यांचे हस्ते प्रतिमा पुजन!

पंढरपूर LIVE 14 मे 2018




क्षात्रवीर स्वराज्य संरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची 361 वी जयंती पंढरपूर लाईव्ह कार्यालयात  उत्साहात संपन्न झाली. 

पंढरपूरचे लोकप्रिय डी.वाय.एस.पी. निखील पिंगळे व यु.पी.एस.सी. परीक्षेत भारतामध्ये 612 व्या रँकमध्ये स्थान पटकावून नेत्रदिपक यश मिळविलेले वाखरी, ता.पंढरपूर चे सुपूत्र संतोष माळी यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. संभाजी महाराज यांच्या जाज्वल इतिहासाला स्मरुन त्यांना अभिवादन केले.

यावेळी स्वाद किंग मसाला चे संचालक अप्पा बाबर, पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, अ.भा. छावा युवा संघटनेचे सागर कदम, नागेश गायकवाड, बालाजी माने, सतीश (अप्पा) माने, गणेश  थिटे, महेश वाघमारे आदी उपस्थित होते. 

यावेळी डी.वाय.एस.पी. निखील पिंगळे यांनी पंढरपूर लाईव्हच्या नि:स्पृह आणि सत्यवादी पत्रकारितेच्या कार्याचे कौतुक केले. उपस्थित मान्यवरांना पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांनी पंढरपूर लाईव्हचे वेब पोर्टल दाखवले व यातील बातम्यांबाबत व वाचकांच्या दर्शकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल माहिती दिली. व सर्वांचे आभार मानले.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments