पंढरपूर LIVE 14 मे 2018
क्षात्रवीर स्वराज्य संरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची 361 वी जयंती आज पंढरीत मोठ्या उत्सहात संपन्न झाली.
सकाळी साडे नऊ वाजता पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने पंढरपूर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शंभूराजांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, पांडुरंग साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख, नगरसेविका सौ.रेणुकाताई घोडके, शकुंतला नडगिरी, नगरसेवक संजय निंबाळकर, विवेक परदेशी, विक्रम शिरसट, बसवेश्वर देवमारे, वामनतात्या बंदपट्टे, प्रशांत शिंदे, नृसिंह सिंघण व इब्राहीम बोहरी, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, मर्चंट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले, समाजसेवक धर्मराज घोडके, यांच्यासह अनेक मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या 361 व्या जयंतीनिमित्त पंढरपूरमधील संभाजी ब्रिगेड, अ.भा. छावा संघटना, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान, छत्रपती उदयनराजे भोसले सेवा प्रतिष्ठान आदींसह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सचिन पाटील, अॅड. तानाजी सरदार, स्वागत कदम, किरणराज घाडगे, संदीप पाटील, सागर कदम, बाळासाहेब बागल, स्वप्नील गायकवाड, गोपी वाडदेकर, बंडुकाका शिंदे, सौदागर मोळक, संदीप केंदळे, संदीप मुटकुळे, किरण शहा, शेखर भोसले, बाळासाहेब गोडबोले, बाळासाहेब कोले, प्रसाद खाडीलकर, नागेश गायकवाड, बालाजी माने, सतिश (अप्पा) माने, गणेश थिटे, अनिकेत मेटकरी, बंटी वाघ, रवि साबळे, बाळासाहेब शिंदे, प्रशांत सुरवसे, आकाश पवार व पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते व छत्रपती संभाजी महाराज प्रेमींनी शंभुराजेंना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने छात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळ्याचे पुजन मा.आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, पांडुरंग सह.सा.कारखान्याचे उपाध्यक्ष. वसंतनाना देशमुख, नगरसेवक संजय निंबाळकर, उपनगराध्यक्ष विशाल दगडु मलपे, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी गटनेते गुरुदास अभ्यंकर, महिला व बालकल्याण समिती सभापती रेणुका घोडके, शिक्षण समिती सभापती विवेक परदेशी, , माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, नगरसेविका शकुंतला नडगिरे, नगरसेवक वामन बंदपट्टे, विक्रम शिरसट, सुजितकुमार सर्वगोड, प्रशांत शिंदे, ऋषीकेश उत्पात, नरसिंह शिंगण, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, अॅड.तानाजी सरदार, समाजिक कार्यकर्ते बसवेश्वर देवमारे, नवनाथ रानगट, इब्राहीम बोहरी, धर्मराज घोडके, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी व समाज बंधाव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments