स्वेरीचे समाजोपयोगी उपक्रम असतात-प्राचार्य जे.बी.गायकवाड

पंढरपूर LIVE 12 मे 2018


कॅन्सरवरील संशोधन करण्यासाठी ‘फोल्डस्कोप’ प्रयोगशाळेचे उदघाटन
पंढरपूर- सोलापूर जिल्ह्यातील स्वेरी एकमेव महाविद्यालय असे आहे की तंत्रशिक्षणाबरोबरच समाजासाठी उपयोगी ठरणारे विधायक कार्य करताना ग्रामीण भागातील परिसरातील विद्यार्थ्यांचा विकास होत आहे पाणी परीक्षणापासून ते पंढरपूर तालुक्यातील पाच शाळा वाय-फाय इंटरनेटद्वारे जोडून त्याचे टॅबलेटद्वारे गणिताचे सूत्र सोपी-सहज जमवून विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करून शिकविण्याच्या तंत्रामुळे विद्यार्थी शाळेकडे अधिक आकर्षित होत आहे. त्यामुळे स्वेरीच्या हातून विधायक व समाजोपयोगी कार्य होत आहे.’ असे प्रतिपादन चळे (ता. पंढरपूर) मधील दर्लिंग विद्यामंदीरचे प्राचार्य जे.बी.गायकवाड यांनी व्यक्त केले.


          ‘डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजी’ यांच्याकडून डेव्हलपमेन्ट ऑफ अ कॅड सिस्टम्स फॉर द अर्ली डिटेक्शन ऑफ लंग कॅन्सर’ या विषयात संशोधनाकरीता कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा सौ.वनिता जाधवडॉ. सुलभा आपटे, प्रा. जयंत बोकेफोडे आणि प्रा. पंकज गायकवाड यांना ‘फुफ्फुसात होणारा कॅन्सर विकार’ हा लवकरात लवकर समजून येण्याच्या उपकरणांचे संशोधन करण्यासाठी नवी दिल्लीच्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नोलॉजीमिनिस्ट्री ऑफ सायन्स अँन्ड टेक्नोलॉजी, गव्हर्मेंट ऑफ इंडिया आठ लाख रुपयांचा निधी व फोल्ड्स्कोप उपकरण दिले आहे. त्याचा वापर कसा करावा? एक दिवसीय कार्यशाळेसाठी आमंत्रित केले होते. त्यात प्राचार्य जे.बी.गायकवाड मत व्यक्त करत होते. प्रारंभी कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा. व्ही,.डी. जाधव यांनी प्रस्तविक करताना, ‘फोल्ड्स्कोप’चा वापर कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत यासाठी लागणारा खर्च याची सविस्तर माहिती दिली. संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार म्हणाले की,’ तंत्रज्ञान आणि संशोधनामुळे समाजाचा विकास होऊ शकतो. आपल्या मेंदूचा विकास जसजसा होईल तसा अधिक संशोधन घडेल यासाठी संशोधक व प्राध्यापकांनी आपल्या कार्यात सतत मग्न रहावे. त्यामुळे संशोधनात काम केल्याचा आनंद अधिक होईल. यामध्ये इमेज प्रोसेसिंगच्या माध्यमातून लंग कॅन्सरच्या मेडिकल इमेजेसद्वारे कॉम्प्यूटर एडेड डिझाईनचा वापर करून पहिल्या टप्प्यात असणारा कॅन्सर शोधण्यास मदत करणारे अल्गोरिदम तयार करण्यात येणार आहे. डॉ.मनु प्रकाश यांनी ‘फोल्डस्कोप’ हा जगातला सर्वात स्वस्त ‘पेपर मायक्रोस्कोप’ बनविला असून या योजनेअंतर्गत ह्या मायक्रोस्कोपचा उपयोग हा सर्व शाळांतील मुलांना जीवशास्त्राकडे मुलांचे आकर्षण वाढविण्याकरिता होणार आहे.’ असे सांगितले. यासाठी तालुक्यातील आमंत्रित केलेल्या विविध शाळेतील प्राचार्य व शिक्षकांना याबाबत प्रा. जयंत बोकेफोडे यांनी प्रशिक्षण दिले. स्वेरी आता तंत्रशिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करत असून स्वेरीने नवनवीन संशोधन करत ग्रामीण भागात संशोधनाचे वातावरण तयार केले आहे. यापूर्वी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी संशोधन विभागाचा चार्ज घेतल्यापासूनमागील दहा वर्षात औद्योगिक चेन मधील बिघाड कमी करण्यासाठी त्याच्या उत्पादन पद्धतीत सुधारणा करणेरुरल ह्युमन अँन्ड रिसोर्स डेव्हलपमेन्ट फॅसिलिटी मधून निसर्गऋण (बायोगॅस)माती परीक्षणबी-बियाणे तयार करणेमध्यम क्षमता हवामान केंद्रसौरउर्जा,ग्रामीण भागासाठी जनावरांच्या प्रजननावर संशोधन करणेजलशुद्धीकरण संयंत्र, लेजरद्वारे जमिनीचे सपाटीकरण करण्याकरीता लागणारी उपकरणे विकसित करणेहेलिकॉप्टरच्या कम्पोझिट ब्लेडमध्ये झालेल्या बिघाडांचा शोध घेण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेसंदर्भातील संशोधन या व असे विविध प्रकारचे संशोधन केले आहे. यासाठी गेल्या दहा वर्षात संशोधनासाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयभाभा संशोधन केंद्र मुंबई, राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नालॉजी कमीशनमहाराष्ट्र शासनमुंबईराजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्स टेक्नालॉजी इंदौर यांच्याकडून जवळपास साडेपाच कोटीपर्यंतचा निधी मिळविला आहे. यांच्याच अंतर्गत कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग विभागातर्फे  चळेआंबे,पंढरपूरकासेगाव व खर्डी येथील शाळा इंटरनेटच्या एक्सप्रेस वे मार्फत एकत्र जोडल्या असून त्यासाठी आकाश टॅब्लेटद्वारे वाय-फाय कनेक्टीव्हिटी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा वापर करून तेथील शाळांमधील मुलांना भारतातील कोणत्याही शाळेबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षण घेण्याची व संवाद साधण्याची संधी उपलब्ध केली आहे.आता तंत्रशिक्षणाबरोबरच संशोधनात देखील स्वेरीने आघाडी घेतली आहे हे स्पष्ठ होते. आता या फुफ्फुसात होणारा कॅन्सरवरील संशोधनात फ्लोडस्कोपद्वारे कॅन्सर विकाराचा शोध घेणे सोपे होणार आहे. कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा. सौ.वनिता जाधव याना संशोधन करण्यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगेसंशोधन विभागाचे प्रमुख डॉ.प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन मिळत आहे. हा संशोधन प्रकल्प निधी एक वर्षासाठी असून उपकरणाच्या उदघाटनप्रसंगी एन.डी.गोडसे, (खरसोली),आर.डी.भातलवंडे (पंढरपूर) आलोक पवार (सांगोला) सागर लोंढे (सोनके), रुपाली लेंगरे (कासेगाव), प्रसाद संत (खर्डी) यांच्यासह पंढरपूर तालुक्यातील शिक्षकवर्ग तसेच अधिष्ठाता डॉ. एस.एम.मुकणे,विभागप्रमुख डॉ. ए.एस. विभूते, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. एस.आर.गवळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस.ए. शेकदार यांनी केले तर आभार प्रा. जयंत बोकेफोडे यांनी मानले.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments