बावडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किरण पाटील यांची बिनविरोध निवड

पंढरपूर LIVE 17 मे 2018

नुतन सरपंच किरण पाटील यांचा सत्कार करताना जयंत नायकुडे सर, ग्रामस्थ व मान्यवर.

इंदापूर तालुक्यातील बावडा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किरण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली
आहे. काँग्रेस आय चे नेते हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादीचे नेते अशोक घोगरे यांच्या प्रयत्नातून त्यांची बिनविरोध निवड झाली. बावडा ग्रामपंचायतीवर गेल्या 40 वर्षात प्रथमच सरपंचपदाची निवड ही बिनविरोध झाल्याने किरण पाटील यांची ही निवड ऐतिहासिक समजली जाते. किरण पाटील हे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान सचिव आहेत. ते सायन्स शाखेचे पदवीधर असून बारामती च्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केलेले आहे.  त्यांच्या रुपाने बावडा ग्रामपंचायतीला एक उच्चशिक्षीत, स्वच्छ चारित्र्याचा, विकासाची दुरदृष्टी असलेला सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य करणारा सर्वसमावेशक ‘सरपंच’ लाभल्याने बावडा गावचा सर्वांगीन विकास होणार असल्याची भावना ग्रामस्थांमधुन व्यक्त होत आहे.

‘‘वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी बिनविरोध सरपंचपदी निवड केल्याबद्दल मी वरिष्ठ नेत्यांचा, सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा व ग्रामस्थांचा आभारी आहे. माझ्यावर मोठ्या विश्‍वासाने सर्वांनी सोपविलेली सरपंचपदाची जबाबदारी मी जबाबदारीने व प्रामाणिकपणे पार पाडीन व सर्वांचा विश्‍वास सार्थ करुन दाखविन.’’ असे मत नुतन सरपंच किरण पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments