पंढरपूर LIVE 16 मे 2018
आसबेवाडीत ‘पाणी फाऊंडेशन’ उपक्रमात स्वेरीचे भव्य योगदान
पंढरपूर- सकाळी साधारण ७ ची वेळ असावी आसबेवाडी (ता. मंगळवेढा) मध्ये पिवळ्या रंगाच्या मोठी लांबलचक दोन स्कूल बस येवून उभ्या राहिल्या काहीजण वाहनावर देखील आले. कोणी कोणाला काहीही न बोलता स्कूल बस मधून पटापट उतरून सोबत आणलेल्या पाट्या,कुदळ, खोऱ्या उचलल्या आणि समोर दिलेल्या जागेत आपले काम सुरु केले आणि हा हा म्हणता तब्बल सात तासात सर्व मिळून साधारण अर्धा किलोमीटर (पाच बांध) अंतराचे खांदुन पाणी साचविण्यासाठी वाट करून देत होते. काहीजण दमल्यावर पाण्याचा घोट घ्यायचे आणि पुन्हा जोमाने कामाला लागायचे ! आसबेवाडीतील काबाडकष्ठ करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा आल्हाददायक नजारा होता ! ज्या हाताची बोटे खडूने पांढरी व्हायची आज त्याच हातात शेतकी अवजारे होती आणि संपूर्ण शरीर घामाने माखून त्यावर शेतातील काळ्या-तांबड्या मातीचे आवरण चढले होते. त्यामुळे आसबेवाडीकरांनी आज श्रमदानाचा वेगळाच अनुभव घेतला.
त्याचे काय झाले. आसबेवाडी हे गाव राज्यभर राबवत असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उतरले असून त्या दृष्टीने तयारी देखील सुरु आहे. आसबेवाडीच्या सरपंच सौ. कलावती आण्णासाहेब आसबे व युवक नेते बाळासाहेब आसबे यांनी ‘तुफान आलंया...’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘पाणी फाऊंडेशन’ उपक्रमासाठी श्रमदान करण्यासाठी स्वेरीला काही विद्यार्थ्यांची मागणी केली होती. परंतु अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. कार्यक्रम तर समाजोपयोगी आहे. पण विद्यार्थी देता येणार नाही परंतु त्यांच्या ऐवजी प्राध्यापक वर्गांनी श्रमदानात सहभाग घेण्याची तयारी दर्शविली. ‘लढे सिपाही और नाम सरदार का?’ हे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सरांना कधीच पटत नाही त्यामुळे त्यांनी स्वतः कुदळ हातात घेवून घाम गाळू लागले. तसे पहिले तर महाविद्यालयातील कामकाज संपल्यानंतर डॉ. रोंगे सर हे शेतात जावून कामे करतात हे अनेकांना माहित नव्हते. परंतु डॉ. रोंगे सरांचा काम करण्याचा जोम पाहता प्राध्यापक देखील मागे सरले नाहीत. ‘सचिव, प्राचार्य ही पदे नंतर ! प्रथम मी एक शेतकरी आहे हे विसरून चालणार नाही’ हेच डॉ. रोंगे सरांच्या कामातून दिसून येत होते. डॉ. रोंगे सरांसमवेत रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, दामाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.बी. पवार, पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी,डिप्लोमा इंजिनीअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर.जी.कुलकर्णी, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. एस. एम.शिंदे, डॉ. आर. एन. हरिदास, फार्मसीचे प्रा. डी. जे यादव तसेच चारही महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून जवळपास तीनशे जणांनी सहभाग घेतला आणि पाहता पाहता पाण्यासाठी चारी खणली. यावेळी उन्हाचा तडाका प्रचंड जाणवत होता. परंतु स्तुत्य उपक्रमापुढे हे ऊन तर काहीच नव्हते.अखेर दिवसभर मोकळ्या रानात उन्हाच्या साथीने घाम पुसत काम फत्ते करून सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे सर स्टाफ सह परतले. स्वेरी स्ताप परतल्यानंतर आसबेवाडीसह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात एकच चर्चा होती. ती म्हणजे, स्वेरीच्या स्टाफनी केला श्रम परिहार कार्यक्रम! सांघिक कार्यामुळे दिवसभरात केलेली स्वच्छता आणि साधारण सर्व मिळून पाचशे फुट लांबीचे, सहा फुट रुंदी आणि अर्धा फुट खोली असलेली शेतजमीन खणलेली पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. माती काढून बंध घालताना तेथील ग्रामस्थांनी आण्णा गुडगुडे, नाड गुडगुडे, दुष्काळ...,ढिशक्यांव, ढिशक्यांव अशा घोषणांमुळे कामातील उत्साह वाढत होता.स्वेरी शिक्षण संकुल महाराष्ट्रात शिक्षणातच अग्रेसर असल्याचे माहित होते. पण आता या व अशा सांघिक सामाजिक कार्यामुळे समाज कार्यात देखील ते मागे नाही हे दिसून आले. याची चर्चा सर्वत्र होत आहे. पाणी फाऊंडेशनच्या या श्रमदानाच्या उपक्रमात सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर यांच्यासह स्वेरीतील उच्चविद्याविभूशीत प्राध्यापकांच्या कामातील जोश पाहून ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ आपल्याच गावाला मिळेल अशी आशा बाळगून ग्रामस्थ देखील तेवढ्याच जोमाने श्रमदान करत आहेत. सायंकाळी आसबेवाडी ग्रामस्थांनी स्वेरी परिवाराचे आभार मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments