पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने शहरात प्लास्टिक बंदी अंतर्गत २ टन प्लॅस्टीक जप्त.

पंढरपूर LIVE 16 मे 2018


महाराष्ट्र शासनाने संपुर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक पासुन बनविल्या जाणा-या पिशव्या, प्लास्टिक थर्माकॉल पासुन बनविण्यता येणा-या वस्तु ताट, कप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, फ्लेक्स, बॅनर्स, तोरण, ध्वज, प्लास्टिक सिट्स, सर्व प्रकारचे प्लास्टिक वेष्टन इ.च्या उत्पादन, वापर, साठवणुक, वितरण, विक्री करण्यास राज्यात निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यास अनुसरुन पंढरपूर नगरपरिषदेने शासन निर्देशानुसार शहरातील सर्व व्यापा-यांना वृतपत्रामध्ये जाहिर प्रसिद्धीकरण देवुन प्लास्टीक उत्पादन व विक्री करण्यास बंदी घातली असल्याने कोणीही प्लास्टीक वस्तुंची विक्री व उत्पादन करु नये असे केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व विक्रीसाठी ठेवण्यात आलेले प्लास्टीक, उत्पादन कोणतीही पुर्व सुचना न देता जप्त केले जाईल अशी सुचना देण्यात आली होती. नगरपरिषदेने असे जाहिर प्रसिद्धीकरण देवुन सुद्धा शहरातील काही व्यापारी प्लास्टीक वस्तुंची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्याने महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकॉल अविघटनशील वस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी, साठवणुक) अधिसुचना २०१८ अन्वये पंढरपूर नगरपरिषदेमार्फत दि.१५-०५-२०१८ रोजी शहरातील प्रदक्षिणा मार्ग, चौफाळा, नविपेठ, स्टेशन रोड इ.भागातील २६ व्यापारी व विक्रेत यांचकडुन २ टन प्लास्टीक व थर्माकॉलच्या वस्तु जप्त करण्यात आल्या.
      सदरची कारवाई पंढरपूर नगरपरिषदेच मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे आदेशान्वये, आरोग्याधिकारी डॉ.संग्राम गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली, अन्न सुरक्षा अधिकारी विनायक शेटे, मलेरीया पर्यवेक्षक धर्मण्णा गजडाकोष व आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे यांनी केली. यावेळी नगरपरिषदेचे सुखदेव माने, लक्ष्मीकांत कोटगिरी, श्रीशैल्य चाबुकस्वार व आरोग्य विभागाकडील वार्ड शिपाई व मुकादम यांचा सहभाग होता.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments