पंढरपूर-पुणे रोडवरील कोळ्याचा मळयानजीक अपघात... वेळापूरच्या नरेंद्र धाईंजे यांचा मृत्यु

पंढरपूर LIVE 16 मे 2018

पंढरपूर-पुणेर रोडवर कोळ्याचा मळा, पिराची कुरोली, ता. पंढरपूर येथे आज दि. 16 मे 2018 रोजी दुपारी साडेबारा च्या दरतम्यान तीन वाहनांचा अपघात घडला. पंढरपूर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात गंभीर जखमी असलेले वेळापूर येथील नरेंद्र धाईंजे यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.  जीपचा टायर फुटल्याने ही जीप समोरुन येणार्‍या छोटा हत्ती या मालवाहतुकीच्या वाहनाला धडकली. आणि मागुन आलेली दुचाकी छोटा हत्ती वाहनाच्या खाली घुसली होती. 

या अपघातात सात ते आठजण जखमी झाले. जि.प. सदस्य बाळासाहेब धाईंजे यांचे बंधु नरेंद्र विनायक धाईंजे (वय-अंदाजे 50) हे या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार चालु असताना त्यांचा मृत्यु झाला. अकलुज येथील इनामदार हॉस्पिटल येथे अन्य जखमीवर उपचार असून या अपघाताबाबत अधिक माहिती घेण्यासाठी उजनी वसाहतीमधील नवीन पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस अकलुजकडे रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी पंढरपूर लाईव्हला दिली आहे.









महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments