पंढरपूर LIVE 21 मे 2018
जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठानच्यावतीने स्वेरीत ‘जागतिक पशुसंवर्धन दिन’ साजरा
पंढरपूर- ‘पूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापुरात एकच अभियांत्रिकी महाविद्यालय होते त्यात देखील मोजक्याच मुलांना प्रवेश मिळायचा. पुढे या ओसाड माळरानावर डॉ. रोंगे सरांनी तंत्रशिक्षण महाविद्यालय उभे केले आणि ते यशस्वीपणे चालवून दाखविले. आज या महाविद्यालयात अभियंता घडविण्याचे सर्वोत्तम कार्य घडत आहे. डॉ रोंगेंनी हे महाविद्यालय अत्यंत कष्टाने, प्रामाणिकपणे आणि तळमळीने चालविट आहेत त्यामुळे स्वेरीची चौफेर प्रगती होत असलेली दिसते. त्यांच्या मनाचा मोठेपणा हा आहे की, स्वेरीला मिळालेल्या यशात ते इतरांना देखील सहभागी करून घेतात.तसेच पशुवैद्यकीय क्षेत्रातील सत्कारमूर्तीं डॉ. बेले आणि डॉ. रसाळे यांची कार्य करण्याची पद्धत उत्तम होती. त्यामुळे त्यांचा उचित सत्कार झाला.’ असे प्रतिपादन पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी व्यक्त केले.
‘जागतिक पशुसंवर्धन दिन’ निमित्ताने येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात’ जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान'च्या वतीने आयोजिलेल्या ‘तांत्रिक परिसंवाद व जीवन गौरव पुरस्कार वितरण’ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार परिचारक मार्गदर्शन करत होते. अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे होते. प्रारंभी पशुवैद्यक प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वास मोरे यांनी ‘जागतिक पशुसंवर्धन दिना’चे महत्व पटवून देवून ‘पशुवैद्यकिय कार्यालयाची यशस्वी वाटचाल सांगितली. तसेच या निमित्ताने दिला जाणाऱ्या ‘जीवन गौरव पुरस्कारा’चे स्वरूप सांगून माजी आमदार परिचारक आणि डॉ. रोंगे यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी डॉ. टी.एम.बेले यांना तांत्रिक कार्यामुळे आणि डॉ. उद्धव रसाळे यांच्या साहित्यक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्धल जीवन गौरव पुरुस्काराने सन्मानित केले तर तालुका पशुवैद्यक कार्यालयात परिचर असलेले डॉ. श्रीराम यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार केला. यावेळी सांगलीचे पशुधन विकास अधिकारी विजय डोके, पशुसंवर्धन विभाग सोलापूरचे उपायुक्त दिनकर बोर्डे, डॉ. सत्यवान भिंगारे, टाकळीच्या सरपंच सौ नूतन रसाळे, तुकाराम डुबल, गणपत गायकवाड, साहेबराव पाखरे, प्राणीमित्र बाबासाहेब बडवे, पांडुरंग साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्ती डॉ. बेळे, डॉ. रसाळे आणि डॉ. श्रीराम यांनी सत्काराला उत्तर देताना ‘आमच्या कार्याची आणि प्रामाणिक सेवेची आज पोच पावती मिळाली. आज आम्ही कृतार्थ झालो. पंतांच्या हस्ते सत्कार आणि तेही स्वेरी सारख्या एका उत्कृष्ठ शिक्षण संकुलात होतोय यासारखे दुसरे भाग्य नाही.’ अशी प्रतिक्रिया दिली. अध्यक्षीय भाषणात सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की,’ स्वेरीच्या उभारणीत आणि यशाच्या वाटचालीत माजी आमदार परिचारकांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन आजही त्यांचे कार्य जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला आदर्शवत आहे. त्यांचे सामाजिक कार्यातील योगदान मोजता येणार नाही. त्यांची कामे करण्याची पद्धत अभूतपूर्व असून प्रत्येकाची अडचण दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरच अनुकरणीय आहे.’ असे सांगून माजी आमदार परिचारक यांच्या कार्य पद्धतीची माहिती दिली. मान्यवरांच्या भाषणानंतर पशुवैद्यक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोरे यांनी शेरो-शायरीचा खुबीने वापर केल्यामुळे उपस्थितांमध्ये उर्जा येत होती. यावेळी पशुवैद्यक प्रतिष्ठानचे सचिव डॉ.अनिल सरदेशमुख, उद्योजक सी.पी.बागल, डॉ. उद्धव द्साडे, डॉ. बाग, जिल्ह्यातील पशुसंवर्धन अधिकारी, स्वेरीचे प्राद्यापकवर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार प्रा. करण पाटील यांनी मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments