कासाळ ओढ्याला येणार नदीचे रूप...गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार उपक्रमाची उपरीत सुरूवात; टाटा ट्रस्टचा पुढाकार

पंढरपूर LIVE 21 मे 2018


। पंढरपूर, प्रतिनिधी
पाणी टंचाई असलेल्या भागामध्ये शासनाच्या वतीने लोकसहभागातून ‘गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत सिंचन प्रकल्पामधील गाळ काढून शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. त्यासाठी विविध संस्थांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. उपरी (ता. पंढरपूर) येथील कासाळ ओढ्यातील खोलीकरण व रूंदीकरण करण्यासाठी टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला असून सोमवारी कामाची सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यात सर्वात मोठा ओढा म्हणून उपरी येथील कासाळ ओढा ओळखला जाणार असून 300 फूट रूंद ओढ्याचे पात्र होणार असल्यामुळे ओढ्याचे रूपांतर नदीत झाल्याचे पहावयास मिळणार आहे.
सिंचन क्षमता वाढून पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाच्या वतीने ‘गाळमुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये तालुक्यातील गार्डी, पळशी, सुपली, उपरी, भंडीशेगांव, वाडीकुरोली व शेळवे आदी गावांमधून वाहत जाणार्‍या कासाळ ओढ्यातील खोलीकरण व रूंदीकरणाचे काम टाटा ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत आहे. उपरी येथे जवळपास 4 किलोमीटर लांब कासाळ ओढा आहे. ओढ्यामध्ये ग्रामपंचायत पाणी पुरवठा विहीर असून उन्हाळ्यातील दिवसात विहिर कोरडी पडल्यानंतर टँकरद्वारे गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे ओढा रूंदीकरण व खोलीकरण करून मिळावे ही अनेक दिवसापासून ग्रामस्थांची मागणी होती. लोकसहभागातून ओढ्यामध्ये खोलीकरण व रूंदीकरणाचे काही प्रमाणात काम करण्यात आले आहे. सोमवारी टाटा ट्रस्टच्या वतीने ओढ्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली.
यावेळी नायब तहसिलदार सुरेश तिटकारे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पवार एस.जे., तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवनाथ आसबे, सरपंच प्रतिनिधी शहाजी मोहिते, उपसरपंच आण्णासोा नागणे, हनुमान दूध संस्थेचे चेअरमन पै. साहेबराव नागणे, बी.वाय.अ‍ॅग्रोटेकचे प्रोप्रा. बाळासाहेब यलमार, शहाजी नागणे, मोहन घोलप, शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत जाधव, महेश नागणे, अशोक जगदाळे, तलाठी सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नायब तहसिलदार तिटकारे म्हणाले की, ग्रामस्थांनी शासनाच्या जलयुक्त शिवार अंतर्गत राबविण्यात येणार्‍या उपक्रमाचा फायदा करून घ्यावा, ओढ्याचे खोलीकरण व रूंदीकरण झाल्यानंतर पाणी टंचाई कायमची दूर होणार आहे. टाटा ट्रस्टचे काम पारदर्शी असून ट्रस्टच्या वतीने शेतकर्‍यांसाठी भविष्यात अनेक महत्वपूर्ण योजना राबविण्यात येणार असून उपरी येथे कासाळ ओढ्याचे सर्वाधिक रूंदीकरण होणार आहे. त्यामुळे ओढ्याचे रूपांतर नदीत होणार आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक रूंदीकरण असणारा हा एकमेव ओढा असल्याचे यावेळी तिटकारे यांनी सांगितले.
याप्रसंगी टाटा ट्रस्टच्या वतीने शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती समुह संघटक कुलदिप कांबळे यांनी दिली. याप्रसंगी समुह संघटक प्रमोद पवार, तांत्रिक अधिकारी विठ्ठल पालवे, निरंजन कंडे, उद्योगपती एल.आर.जाधव, बाळासाहेब नागणे यांच्यासह सुपली परिसरातील शेतकरी उपस्थित होते. 

आधुनिक शेतीबरोबर शेतकर्‍यांना उद्योगशील बनविण्याचे काम ट्रस्ट करणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांसाठी ट्रस्टच्या वतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत.
- कुलदिप कांबळे समुह संघटक, टाटा ट्रस्ट










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments