सोलापुरात ३ जून रोजी होणाऱ्या लिंगायत समाजाच्या महामोर्चा संबंधी पंढरपुरात बैठक संपन्न...पंढरपुरातून जाणार मोठ्या संख्येने समाज बांधव!

पंढरपूर LIVE 21 मे 2018


पंढरपूर - येत्या ३ जून रोजी सोलापुरात लिंगायत धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी व राष्ट्रीय स्तरावर अल्प संख्यांक दर्जा मिळावा यासाठी लिंगायत समाजाच्या सर्व पोट जातीसह होणाऱ्या महामोर्चांच्या पार्श्वभूमीवर येथील नवीपेठ मधील श्री.मन्मथ स्वामी मठ संस्थानामध्ये लिंगायत समाजाचे आधारस्थंनंदकुमार (प्पा) डोंबे, नगरसेवक निलराज डोंबे , शिरिष पंतोजी पाटील, सुरज पावले, प्रशांत मेनकुदळे यांच्या उपस्थितीत भव्यबैठक पार पडली.
          या बैठकीमध्ये महामोर्चाचे आयोजन, मागण्या काय असावेत? याविषयी चर्चा झाली. लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा, याच बरोबर अनेक मागण्या ज्या अजूनही प्रशासकीय दरबारात प्रलंबित आहेत. या मागणीसाठी येत्या ३ जुन २०१८  रोजी अनुभव मंपाचे तिसरे अध्यक्ष शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्यापावनभूमी असलेल्या सोलापूर संपुर्ण राज्यात लिंगायतांचीराजधानी म्हणुन ओळखले जाणारे सोलापुर शहर येथे लिंगायत (सर्व पोट जातीसह )धर्म महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजभूषण नंदकुमार(प्पा) डोंबे म्हणाले की, ‘आपल्या समाजातील मुला-मुलीना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात, कागदपत्रे, प्रमाणपत्रे अशा अनेक बाबी आहेत की ज्यामुळे आपल्या समाजातील मुले हुशार असूनही केवळ कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत शासन उदासीन असल्यामुळे विद्यार्थ्यांना म्हणावे एवढे न्याय अजून मिळाला नाही. यासाठी सर्वजन एकजुटीने शासनाकडे दाद मागू, यासाठी ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या ३ जून रोजी होणाऱ्या महामोर्चासाठी पंढरपूर मधील लिंगायत समाज बांधव एकजुटीने मोर्चात सहभागी होतील.’ सदरचा महामोर्चा यशस्वी करण्याकरिता समाजभूषण नंदकुमार(प्पा)  डोंबे यांच्या दिशादर्शक नेतृत्वाखाली लिंगायत समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पंढरपुर शहर व तालुक्यातील लिंगायत समाज बांधव व युवकांना मोर्चेस सहभागी होण्याचा निर्धार केला.यावेळी बैठकीत समाजाचे अविनाश भोसीकरजिल्हा समन्वयक विजयकुमार हत्तुरेविजय बुरकुलसकलेश बाबुळगावकरमयूर स्वामी, विकास मरगुर, अमित रोडगे, राजेंद्र पावले (सर), उदय खटावकर(सर)धनंजय मेनकुदळे, विश्वनाथ ठिगळे, मेनकुदळे,शंकर पावले, अनिल  शेटे, आकाश कावळे, प्रथमेश पावले, आदीलिंगायत समाज बांधव व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र- येत्या ३ जून रोजी सोलापुरात होणाऱ्या मोहमोर्चाचे पत्रकाचे स्वागत करताना समाजभूषण नंदकुमार (प्पा) डोंबेयांच्यासह पंढरपुरातील लिंगायत समाज बांधव.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments