नरेंद्र मोदी विचार मंचच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सौ. आरती बसवंती यांची नियुक्ती!

पंढरपूर LIVE 21 मे 2018

पंढरपूर (प्रतिनिधी):- मा.नरेंद्र मोदी विचार मंच (भारत)च्या लघु उद्योग महिला विभागाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर येथील सौ. आरती ओंकार बसवंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच त्यांना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वासुदेव शर्मा यांनी नियुक्तीचे पत्र प्रदान केले. सौ. बसवंती यांच्या सामाजिक जागृती व वाईट प्रवृत्तींविरुध्द संघर्ष करण्याच्या कार्याचा तसेच महिला सबलीकरणासाठीच्या त्यांच्या योगदानाचा विचार करुन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री ना.विजयकुमार देशमुख, नरेंद्र मोदी विचार मंच  चे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत वासुदेव शर्मा व अनेक मान्यवरांनी सौ. आरती बसवंती यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करुन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


नरेंद्र मोदी विचार मंच (भारत) च्या वतीने सक्रीय सामाजिक कार्य करण्यात येते. ज्याद्वारे  प्रशासनाला सहकार्य मिळते. त्यामुळे शासनाच्या कार्यात सर्वसामान्य जनतेचा अधिकाधिक सहभाग निश्‍चित होतो. देशातील सर्व वाईट प्रवृत्तींचे समुळ उच्चाटण करण्यासाठी व महिलांना उद्योग क्षेत्रात आवश्यक ते सहकार्य करुन महिला सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन मंचाद्वारे केले आहे.

भारत देशाला एक प्रबुध्द, सर्वसंपन्न बनविणे देशाची लोकशाही अधिक मजबुत करण्यासाठी सर्व नागरिकांना सोबत घेऊन सामाजिक, राजनैतिक, न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि समता अबाधित राखण्यासाठी कार्य करु. मंचाने आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडु. महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरीत करुन आवश्यक ते सर्व सहकार्य करुन महिलांना उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न करु. तसेच देशाचे प्रतिभावंत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठीचे प्रथम कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे मत यावेळी सौ. आरती बसवंती यांनी व्यक्त केले.










महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments