दुध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दुध भुकटी उत्पादनासाठी शासनाकडून प्रोत्साहनपर अनुदान

पंढरपूर LIVE 8 मे 2018


            राज्यातील दुधाची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन त्याचा दुध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी सहकारी व खासगी दुध भुकटी (मिल्क पावडर) उत्पादकांना प्रति लिटर दुधामागे तीन रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मार्च 2018 मध्ये उत्पादित केलेल्या दुध भुकटीपेक्षा किमान 20 टक्के अतिरिक्त दुध भुकटी तयार करणाऱ्यांना आजच्या निर्णयाचा लाभ होणार आहे. शासन निर्णय काढल्याच्या दिनांकापासून पुढील 30 दिवसांच्या कालावधीसाठी हा निर्णय लागू असेल.
राज्यात सध्या दुधाचे अतिरिक्त उत्पादन झालेले आहे. मात्रयाच काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  बाजारात दुध भुकटीचे दर घसरलेले आहेत. घसरलेल्या दरांमुळे कमी दुध भुकटी तयार करण्याकडे प्रकल्पधारकांचा कल असतो. तसेच दुधाची भुकटी निर्माण करणे परवडत नसल्याने प्रकल्पधारकांकडून कमी दराने दूध खरेदी करण्यात येते. याचा सरळ परिणाम दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो. त्यामुळे दुध भुकटी उत्पादकांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन दुध खरेदीस चालना देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून अतिरिक्त उत्पादित दुधाचा विनियोगदेखील त्यामुळे शक्य होणार आहे.
            साधारणपणे 100 लिटर दुधाचे रुपांतरण दुध भुकटी व लोणी यामध्ये करताना होणारा खर्च आणि त्यातून मिळणारे उत्पन्नाचा विचार करता एकूण 324 रुपये 55 पैसे इतका म्हणजेच प्रति लीटर दुधामागे 3 रुपये 24 पैसे इतका तोटा दुध भुकटी प्रकल्पधारकांना येतो. राज्यात 31 मार्च 2018 अखेर 26 हजार 506 मे. टन इतका दुधाची भुकटी शिल्लक आहे.
-----0-----












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com


वृ.वि.2007                                                                        16 वैशाख, 1939 (दु. 4.50)
                                                                                                दि. 8 मे 2018
राज्यभरात अठ्ठावीस लाख क्विंटलहून अधिक तूर खरेदी
- सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख
मुंबई, दि. 8 : राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. काल दि. ७ मे पर्यत १९२ तूर केंद्रांवर दोन लाख ३० हजार ३४८ शेतकऱ्यांची  २८ लाख ८८ हजार ९१८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
तूर खरेदीला मुदतवाढ दिली असून आता १५ मेपर्यंत तूर खरेदी होणार आहे. सध्या कार्यरत खरेदी केंद्रा शिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेतअसेही पणन मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.
००००


वृ.वि.2008                                                                        16 वैशाख, 1939 (दु. 4.50)
                                                                                                दि. 8 मे 2018

दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रतिलिटर 3 रुपये अनुदान
दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा
यासाठी मंत्रीमंडळाचा निर्णय
महादेव जानकर
मुंबईदि. 8 : दूध उत्पादकांना योग्य दर देता यावा यासाठी सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी उत्पादित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दुधाला प्रतिलिटर 3 रुपये अनुदान देण्याचा निर्णय आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धनदुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दिली. या निर्णयाच्या परिणामी दूध उत्पादकांच्या दुधाला निश्चितपणे योग्य दर मिळेलअसा विश्वासही श्री. जानकर यांनी व्यक्त केला आहे.
            श्री. जानकर यांनी पुढे माहिती दिलीराज्यात सध्या अतिरिक्त दुधाचे उत्पादन झालेले आहे. याच काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय  बाजारात दूध भुकटीचे दरही घसरलेले आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरलेल्या दूध भुकटीच्या दरामुळे दूध भुकटी प्रकल्पधारकांचा कल कमी दूध भुकटी तयार करण्याकडे असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत दूध भुकटी प्रकल्पधारक दूध भुकटी निर्मितीकरिता शेतकऱ्यांकडून कमी दराने दूध खरेदी करतात. याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होतो.
            मार्च 2018 अखेर रोजी 26506.70 मेट्रीक टन इतका दूध भुकटी साठा शिल्लक आहे. या परिस्थितीचा प्रतिकूल परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होऊ नये यासाठी दूध भुकटी प्रकल्पधारकांना अधिक दूध भुकटी उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या नुसार शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून पुढील 30 दिवसांच्या कालावधीमध्ये मार्च 2018 मध्ये उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान 20 टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन करणाऱ्या सहकारी व खासगी दूध भुकटी प्रकल्पधारकांना दूध भुकटी बनविण्याकरिता वापरलेल्या दुधासाठी प्रती लिटर 3 रुपये इतके प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
            दूध भुकटी प्रकल्पधारकांना प्रती लिटर दूध रुपांतरणासाठी 3 रुपये इतके अनुदान दिल्यास खाजगी व सहकारी दूध उत्पादकांमार्फत सद्य:स्थितीत रुपांतरित करण्यात येणाऱ्या प्रती दिन अंदाजे 36 लाख 41 हजार लिटर दुधासाठी1 कोटी 9 लाख 23 हजार रुपये इतके अनुदान दररोज शासनाकडून दिले जाणार आहे. संपूर्ण 30 दिवसाचा कालावधी लक्षात घेताअंदाजे 32 कोटी  76 लाख रुपये इतके अनुदान शासनामार्फत प्रोत्साहनपर अनुदान म्हणून दिले जाणार आहे. दूध भुकटी प्रकल्पधारकांना माहे मार्च,2018 मध्ये त्यांनी उत्पादित केलेल्या दूध भुकटीपेक्षा किमान 20 टक्के अधिक दूध भुकटीचे उत्पादन केल्यावर याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या दूध खरेदीवर होणार असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचारही या निर्णयामागे असल्याचे श्री. जानकर यांनी स्पष्ट केले आहे.












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments