पंढरपूर LIVE 8 मे 2018
पंढरपूर–‘एकीकडे भारतात २०० अभियांत्रिकी महाविद्यालय बंद होण्याच्या मार्गावर असताना व त्यामुळे प्रवेशाच्या जागा ऐंशी हजाराने कमी होण्याची परिस्थिती असताना दुसरीकडे केवळ गुणवत्तेच्या जोरावर विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची खास सोय व्हावी म्हणून स्वेरीने नव्याने पदवी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी व सिव्हील इंजिनिअरिंगसाठी होणारी प्रचंड मागणी याचा विचार करून वाढीव जागांसाठी असे प्रस्ताव पाठविले होते. या दोन्ही प्रस्तावांना शासनाने नुकतीच मान्यता दिलेली आहे. सदर प्रस्ताव हे पदवी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी इलेक्ट्रिक इंजिनिअरींग ही नवीन ब्रँच ६० प्रवेश क्षमतेसह सुरु करणे व सिव्हील इंजिनिअरींगची ६० प्रवेश क्षमतेवरून १२० करणे असे होते. या प्रस्तावास शासनाने नुकतीच मान्यता दिलेली असून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, गोपाळपूरची प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता आता ४२० वरून वाढून ५४० इतकी झाली आहे.त्यामुळे स्वेरीत पदवी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. अनेक विद्यार्थी स्वेरीमधील सिव्हील अभियांत्रिकी मिळावे यासाठी प्रयत्न करत असतात, पूर्वी ६० जागा होत्या आता त्या वाढून १२० जागांची वाढ करण्यात आल्यामुळे सिव्हील इंजिनिअरिंग प्रेमी विद्यार्थ्यांना आता निराश व्हावे लागणार नाही.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
स्वेरीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची नवीन शाखा व सिव्हील इंजिनिअरिंगच्या प्रवेश क्षमतेत वाढ या कारणामुळे आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे बोलत होते. बऱ्याच अभियांत्रिकी महाविद्यालयांचे ब्रँच बंद करणे व जागा कमी करण्याचे शासनाकडे प्रस्ताव दाखल झाले होते.याच पार्श्वभूमीवर नवीन अभ्यासक्रम सुरु करणे व जागा वाढविण्यासाठीचे फार कमी प्रस्ताव दाखल झाले होते अशा मोजक्या प्रस्तावामध्ये स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, गोपाळपूर, (ता. पंढरपुर)चा सोलापूर जिल्ह्यामधून एकमेव प्रस्ताव होता. सोलापुर जिल्ह्यात सध्या अभियांत्रिकीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल, कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या क्षेत्राबरोबरच आता स्पर्धापरीक्षाच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या संख्येत देखील स्वेरीचे विद्यार्थी आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. परवाच झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षक तथा आर.टी.ओ. या स्पर्धा परीक्षेत स्वेरीचे तब्बल १४ माजी विद्यार्थी अधिकारी झाले आणि संतोष माळी हे विद्यार्थी UPSC परीक्षा ६१२ वा रँक मिळवून उत्तीर्ण झाले. अलिकडेच लागलेल्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राच्या निकालामध्ये या कॉलेजच्या४३ विद्यार्थ्यांनी १० पैकी १० एस.जी.पी.ए. मिळवून विद्यापीठात नवीन विक्रम केलेले आहे. याचा परिणाम म्हणून स्वेरीने प्रथम वर्ष अॅडमिशनमध्ये जिल्ह्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
यामुळे आता स्वेरीत नित्य राबवित असलेल्या ‘पंढरपूर पॅटर्न’मुळे राज्यातील १२ वी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले आहे. आदरयुक्त शिस्त, विद्यार्थ्याकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष, वसतिगृहातील शिस्त, रात्र अभ्यासिका, संशोधनाचे वातावरण, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका, कॅम्पसमध्ये चोहोबाजूने लावलेले सीसी टीव्ही कॅमेरे यासारख्या योजना व उपक्रम तसेच सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ग्रामीण भागातील सर्वोकृष्ठ महाविद्यालय म्हणून स्वेरी अभियांत्रिकीला सोलापूर विद्यापीठाकडून नुकतेच गौरवण्यात आले. तंत्रशिक्षतील उत्तमतेचा सर्वोच्च निकष NBA मानांकित सर्व पात्र पदवी अभ्यासक्रम व सोबत NAAC मानांकन असणारे स्वेरी हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे. दरवर्षी ९० टक्क्याहून अधिक प्लेसमेंट असून यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत तब्बल ३२० विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून नोकरी मिळाली आहे व अजून निवड प्रक्रिया सुरु आहे. यामुळे ग्रामीण भागातील मुले हे स्वेरीमध्येच प्रवेश कसा मिळेल याकडे लक्ष देवून असतात. इलेक्ट्रिक इंजिनिअरींग हा विभाग पूर्वी डिप्लोमाकडे होती त्यामुळे डिग्री इंजिनिअरींगकडे देखील इलेक्ट्रिक इंजिनिअरींग विभाग असाअसावी अशी पालकांची मागणी होती. त्यामुळे डिप्लोमा इलेक्ट्रिकल उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता पदवी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची झालेली सोय व सिव्हील इंजिनिअरिंगसाठी वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी ६० जागा वाढलेल्या आहेत. यामुळे स्वेरीवर लक्ष ठेवणाऱ्या बारावी सायन्स परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अधिक आनंद झाला आहे. शिक्षण क्षेत्रात स्वेरीने घेतलेली गरुड भरारी पाहून नागरिकांची अपेक्षा आणखी वाढल्याचे पत्रकारांनी सांगून वैद्यकिय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी जोर धरत असल्याचे पत्रकारांनी सांगितले. पत्रकारांनी देखील स्वेरीच्या अफाट यशामुळे नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे सांगितले. उपस्थितांचे आभार मानताना स्वेरीचे जेष्ठ विश्वस्थ दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘पत्रकार हा समाजाचा चौथा स्थंभ असून त्यांच्या नजरेतून वृत्तपत्राच्या माध्यमातून दाखविलेल्या उणीवा ह्यामध्ये समाज सुधारणा करत असतो. आपण सुचविलेल्या शैक्षणिक मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि नागरिकांच्या विश्वासाला कायम पात्र राहू.’ अशी ग्वाही दिली. या पत्रकार परिषदेत संस्थेचे जेष्ठ विश्वस्थ दादासाहेब रोंगे, संशोधनविभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम. पवार, प्रा. यु.एल.अनुसे, संतोष हालकुडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments