पंढरपूर LIVE 29 मे 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) : चार काटक्या एकत्र करणे, दोन-चार पिल्लांना जन्म देणे असा संसार न करता देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी कामे केले. देश स्वतंत्र व्हावा यासाठी सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. यामध्ये त्यांना अतोनात हाल सहन करावे लागले. सावरकरांनी देशासाठी केलेले कार्य हे आजच्या तरूण पिढीने वाचले पाहिजे, अंगिकारले पाहिजे, असे प्रतिपादन अभिनव अॅकॅडमीच्या संचालिका मैत्रेयी केसकर यांनी केले.
संत पेठ येथील सुडके गल्ली येथे आयोजित केलेल्या सावरकर जयंतीनिमित्त सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन मंदार केसकर व मैत्रेयी केसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
सावरकर हे थोर विचारवंत होते, ते लेखक होते, ते कवी होते, ते पत्रकार होते, ते व्यासंगी होते, ते निस्सीम देशभक्त होते. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी मदनलाल धिंग्रा यांच्या निधनानंतर देशाला स्वातंत्र्य मिळविण्याची शपथ घेतली. या शपथेला अनुसरून त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रकार्यासाठी व्यतिथ केले. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर दलितोद्धारासाठी सावरकरांनी रत्नागिरी येथे पतीतपावन मंदिर उभे केले. पंढरपुरात दलितांच्या वस्तीमध्ये सावरकरांनी स्नेहभोजन घेतले. अशा सावरकरांचे आचरण व विचार आजच्या तरूण पिढीने अंगिकारले पाहिजेत, असे केसकर म्हणाल्या.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, मंदार केसकर, युवा मोर्चा अध्यक्ष विदुल अधटराव, ओबीसी अध्यक्ष लखन ननवरे, भाजपा शहर उपाध्यक्ष अमर अभंगराव, झोपडपट्टी सेल अध्यक्ष भारत कोरे, महिला आघाडी अध्यक्ष अपर्णा तारके, हर्षदा नगरकर, पूजा बोरामणीकर, अंजली भोरकर, सीमा कदम, रोहिणी शिंदे, मेघना बनकर, अभंगराव बुवा, गणेश अंकुशराव, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अक्षय कदम, युवा मोर्चा सरचिटणीस सचिन भोरकडे, उपाध्यक्ष आनंद घोडके, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत धुमाळ, चिटणीस विकास फुले, औदुंबर औसेकर, सुनिल सोळंकी, धिरज करकंबकर, श्रीकांत ननवरे, बाळू सासवडकर, कुणाल कोरे, सतीश सासवडकर, रवी देवमारे, मनोज घोरपडे, व्यंकटेश कोळी, दत्ता पाटील, सुमित पवार, सागर खरात, अनिकेत केदार, श्याम बनसोडे, भैय्या कोळी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments