माजी नगरसेविका ज्योत्स्ना देशपांडे यांचे निधन

पंढरपूर LIVE 29 मे 2018

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर न. पा. च्या माजी नगरसेविका ज्योत्स्ना जयंत देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे. ज्योत्स्ना देशपांडे या नगरसेविका असतानाच लायनेस क्लबच्या माध्यमातून त्यांनी पंढरपुरात सामाजिक कार्य केले आहे. त्यांचे पती जयंत देशपांडे हे कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक होते. तेही लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत होते. नगरसेविका असताना माजी आ. सुधाकर परिचारक यांच्या गटातून त्यांनी आपल्या प्रभागामधील अनेक समस्या मार्गी लावल्या होत्या. आज सकाळी ज्योत्स्ना देशपांडे यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 









महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments