पंढरपूर LIVE 31 मे 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पंढरीत उत्साहात संपन्न झाली. मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने सकाळी 9 वाजता शिवतिर्थावर राजमाता अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पंढरीतील डॉक्टर मंडळींच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती जयंतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. संजय पडळकर यांचे शुभहस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. सुत्रसंचलन नाना खांडेकर यांनी केले. पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा व अनेक नगरसेवकांनी राजमाता अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने आजपासून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा जयंती उत्सव सोहळा सुरु करण्यात आला आहे. रक्तदान शिबीरासह विविध सामाजिक उपक्रम यानिमित्ताने राबविण्यात येत असून उद्या दि. 1 जुन रोजी शिवतिर्थावर दुपारी 3 वाजता विविध कार्यक्रम होतील. यानंतर उद्या सायंकाळी 5 वाजता राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात येणार असून संपुर्ण तालुक्यात मोठ्या उत्साहामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींची जयंती आम्ही साजरी करत असल्याची माहिती मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राहुल हाके यांनी दिली.
आज सकाळी जयंती उत्सव सोहळ्यासाठी डॉ. श्रीकांत देवकते, डॉ. महादेव शिंदे, डॉ. एच.व्ही गावडे, डॉ. सौ. प्रतिभा कारंडे, डॉ. सुनिल कारंडे, डॉ. भुपाल पुजारी, डॉ. एम.आर. टकले, डॉ. विजय देशमुखडॉ. संजय पडळकर, डॉ. सौ. सुनिता पडळकर, डॉ. विजय येडगे, डॉ. एन.व्ही. गावडे, डॉ.सौ.संध्या एच. गावडे, डॉ. धिरज पाटील, डॉ. सौ.सुनिता कारंडे, डॉ.संजय पाटील, डॉ. सुखदेव कारंडे, डॉ.सौ.अर्चना येडगे, डॉ. कैलास टकले, डॉ. सुरज रुपनर, डॉ.सौ.जया पाटील, डॉ. सौ. पल्लवी माने, डॉ. होनमाने, डॉ. संजय मोरे, डॉ. दिपक भेंकी, डॉ.सौ.वर्षाराणी शेंडगे, डॉ. सिद (महुद), डॉ.नाथाजी केसकर, डॉ. शेजल देशमुख, डॉ. विजयालक्ष्मी हिरवे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जयंती उत्सव सोहळा यशस्वी होण्यासाठी मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राहुल वसंत हाके, काशिलिंग खताळ, उपाध्यक्ष गोरख पांढरे, कार्याध्यक्ष अक्षय मेटकरी, नितीन मेटकरी, स्वागताध्यक्ष बालाजी पाटील, आण्णा सलगर, बाबा लगसकर, खजिनदार प्रशांत घोडके, वैभव अलदर, सचिव महेश हाके, सर्जेराव पाटील, संतोष सुळे, मिरवणूक प्रमुख शालिवाहन कोळेकर, संतोष बंडगर, माऊली हळणवर, सोमनाथ ढोणे, पंडीत शेंबडेे, दिपक येळे, रमेश हाके, प्रकाश येडगे, प्रसिध्दीप्रमुख महालिंग दुधाळे, शिवाजी हळणवर, धनंजय वाघमोडे, गोविंद मेटकरी, सतिश लवटे आदी परिश्रम घेत आहेत.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com










0 Comments