पंढरपूर LIVE 18 मे 2018
पंढरपूर प्रतिनिधी
कविटगाव (ता.करमाळा) येथील प्रसिद्ध कादंबरीकार श्रीकृष्ण जगदाळे यांना मराठा मंदिर साहित्य शाखा मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा "वाङमयीन पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
स्मृतिचिन्ह,मानपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे उत्साहात पार पडला.साहित्यिक शशिकांत पवार यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण झाले. हा पुरस्कार श्रीकृष्ण जगदाळे यांच्या "छळछावणी" या कादंबरीला जाहीर झाला होता. यापूर्वी ही त्यांच्या कादंबरीला दोन पुरस्कार मिळाले आहेत.पुरस्कार मिळाल्याबद्दल लेखक हरिश्चंद्र पाटील,राजेश पवार, लेखक अंकुश गाजरे,कवी गणेश गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments