पंढरपूर LIVE 30 मे 2018

सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांची प्रमुख उपस्थिती...
पंढरीत आलेल्या महाराष्ट्र पोलिस अधिकारी कर्मचार्यांच्या
कुटूंबियांसाठी 10 ए.सी. रुम ची सुविधा!
पंढरपूर (प्रतिनिधी):- सोलापूर ग्रामीण पोलीस कल्याण अंतर्गत पंढरीतील पोलिस संकुल येथे उभारण्यात आलेल्या ‘हॉलिडे होम’ चे उद्घाटन आज सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या हॉलिडे होमचेे उद्घाटन पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनी स्वत: न करता याचा मान ए.एस.आय. याकुब शेख व ए.एस.आय. पानसरे यांना दिला. पोलिस खात्यात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्यांना विरेश प्रभुंनी दिलेला हा सन्मान लक्षवेधी ठरला. हॉलिडे होममधील सर्व रुम्स् आणि यातील सोयी-सुविधांची पाहणी यावेळी पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांनी केली. रखुमाई पोलिस संकुल येथील या हॉलिडे होमच्या रुपानेे 10 सुसज्ज ए.सी. रुम्स् सर्व सोयीसुविधांसह उपलब्ध झाल्याने पोलिस कर्मचार्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. देवदर्शनासाठी अथवा कोणत्याही कारणास्तव पंढरीत आलेल्या महाराष्ट्र पोलिस कर्मचार्यांना व त्यांच्या कुटूंबियांना येथे वास्तव्यासाठी उत्तम सोय झालेली आहे.
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, पंढरपूरचे सहाय्यक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, अकलुजचे सहाय्यक पोलिस अधिक्षक चव्हाण, मंगळवेढ्याचे सहाय्यक पोलिस अधिक्षक जगदाळे, बाशीचे सहाय्यक पोलिस अधिक्षक कबाडे, अक्कलकोटचे सहाय्यक पोलिस अधिक्षक यावलकर, करमाळ्याचे सहाय्यक पोलिस अधिक्षक स्वामी, पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक के. के. खराडे, पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, पंढरपूर तालुका पोलिस ठाणे (उजनी वसाहत) चे सहाय्यक पोलिस निरीक्षक मानगावे, शहर वाहतुक शाखेचे चव्हाण व अनेक पोलिस कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
पंढरीत देवदर्शनासाठी अथवा इतर कारणासाठी महाराष्ट्र पोलिस कर्मचार्यांच्या कुटूंबियांना राहण्याची कोणतीही सोय नव्हती. तिर्थक्षेत्र असल्यामुळे येथे लॉजेस सुध्दा वेळेत नाही. याचा विचार करुन आय.जी. साहेबांच्या सल्ल्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिस कल्याण अंतर्गत या हॉलिडे होमची निर्मिती केली गेली आहे. यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या कुटूंबियांना राहण्याची उत्तम सोय झाली आहे. याची निर्मिती करताना कमीत कमी खर्चात ते व्हावे असा आमचा आग्रह होता. ना नफा ना तोटा या तत्वावर पी.डब्ल्यु.डी. ने दिलेल्या इस्टीमेटपेक्षा कमी दरात कंत्राटदार कुंभार व त्यांच्या सहकार्यांनी हे काम केल्याने पोलिस कल्याणचे लाखो रुपये वाचले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून पंढरीत आलेल्या पोलिस बांधवासह त्यांच्या नातेवाईकांची पंढरीत आल्यानंतरची राहण्याची उत्तम सोय करण्यात आल्याबद्दल विशेष आनंद असल्याचेही ते म्हणाले. येथे वास्तव्यासाठी पोलिस कर्मचार्यांनी आपल्या कुटूंबियांच्या माहितीसह एक अर्ज एस.पी. कार्यालयात करायचा आहे. याचा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी लाभ घ्यावा. असेही ते म्हणाले.
हॉलिडे होमच्या निर्मितीसाठी सहकार्य करणारे पंढरपूर नगरपरिषदेचे, एमएसईबी चे अधिकारी कर्मचारी, इंजिनिअर्स, कामगार, तंत्रज्ञ यांचे व उपस्थितांचे आभार यावेळी पंढरपूरचे सहाय्यक पोलिस अधिक्षक निखील पिंगळे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments