‘स्वेरी’ केवळ नाव नसून ‘ब्रँड’ बनले आहे - न्यायमूर्ती पी. आर. देशमुख

पंढरपूर LIVE 19 मे 2018


स्वेरीला दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी न्यायमूर्तींचे गौरवोदगार 
पंढरपूर- ‘जिद्द, प्रामाणिक तळमळ आणि हाती घेतलेल्या कार्यात सातत्य असेल तर माणूस हा अदभूत यश प्राप्त करतो याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वेरीचे तंत्रशिक्षण संकुल होय. स्वेरीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हक्काचे शैक्षणिक दालन मिळालेले असून स्वेरीच्या सहाय्याने विद्यार्थी यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे. खरोखरच स्वेरीला मिळालेले यश हे प्रामाणिक प्रयत्न व खडतर जिद्धीचे प्रतिकच आहे.’ असे प्रतिपादन पंढरपूर न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. आर देशमुख यांनी केले.
          पंढरपूर न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. आर देशमुख यांनी सदिच्छा भेट देण्याच्या निमित्ताने स्वेरीत आले होते. यावेळी संस्थापक सचिव व अभियांत्रिकी प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी संस्थेअंतर्गत असलेली चारही महाविद्यालये, विविध विभाग, संशोधन विभाग, मध्यवर्ती असलेली अँम्पी थिएटर वसतिगृह, सोलार सिस्टम आदी विभाग व उपक्रमांची पाहणी करून माहिती जाणून घेतली आणि स्वेरीच्या नियोजनाचे  कौतुक केले. न्यायमूर्ती पी. आर देशमुख पुढे म्हणाले की,’ स्वेरीची यशोगाथा मी खूप ऐकून होतो. परंतु पाहण्याचा योग आलेला नव्हता. तो आज आला. स्वेरीत गरीब व हुशार विद्यार्थ्यांना झालेली तंत्रशिक्षणाची सोय ही खरोखरच उत्तम असून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक कलागुणांना या ठिकाणी वाव मिळतोय हे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे  आणि त्यामुळे पंढरपूर सारख्या ग्रामीण भागातील या महाविद्यालयाची ओळख ही आता भारताच्या नकाशात स्पष्ठपणे उठून दिसत आहे. प्रत्येक वर्षीची प्रवेश संख्या, वार्षिक परीक्षेच्या निकालात अव्वल राहण्याची कायम राखलेली परंपरा, कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली विलक्षण वाढ आणि त्याचबरोबर आता एम.पी.एस.सी आणि यु.पी.एस.सी सारख्या शासकीय स्पर्धा परीक्षेत देखील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या पहिली असता ‘स्वेरी’ आता केवळ नाव राहिले नसून ‘ब्रँड’ बनले आहे हे स्पष्ठ होते.’ त्यांनी संशोधन विभागात जास्त वेळ देवून माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले.  यावेळी त्यांच्या समवेत सौ. देशमुख, सौ. प्रेमलता रोंगे, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, प्रा. सचिन जाधव, प्रा. व्ही.व्ही. मोरे, प्रा. पी.के. खुळे, न्यायालयीन अधिकारी शिंदे आदी उपस्थित होते.









महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments