पंढरपूर LIVE 19 मे 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव हे अतिशय चांगल्या पध्दतीचे काम करीत आहेत; परंतु त्यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर मागील काळात नाहक खोटे आरोप केले गेले आहेत. महादेव कोळी समाजातील आमच्या एका चांगल्या माणसावर केले गेलेले हे आरोप निराधार असल्याने त्यांच्यावर आरोप करणारांची सखोल चौकशी करुन ते यामध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी महर्षि वाल्मिकी संघ विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीबाबतचे निवेदन पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना देण्यात आले.
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव हे कायम कर्मचार्यांच्या बाजुने उभे राहून चुकीच्या गोष्टीला विरोध करतात. या गोष्टीचा राग मनात धरुन मंदिर समितीच्या वतीने लाडु बनविण्याचा ठेका दिलेल्या सुवर्णक्रांती महिला बचत गटाच्या अध्यक्षा कविता गवळी व अॅड. दत्तात्रय खडतरे यांनी सचिन अधटराव यांच्यावर खंडणी मागितल्याचा बिनबुडाचा आरोप केलेला आहे. तसे करताना त्यांनी कोणतेही पुरावे न देता कांही राजकारणी मंडळींच्या सांगण्यावरुन हे चुकीचे आरोप केलेले आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाही.
वास्तविक पाहता मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी लाडु बनविण्याच्या निविदेमध्ये पॅकींगसह लाडु पुरविण्याची गोष्ट नमुद केली असल्यामुळे नव्याने पॅकींग खर्चाची निविदा काढण्याला विरोध केलेला आहे. या गोष्टीचा राग मनात धरुन कविता गवळी व अॅड. खडतरे यांनी अधटराव यांच्यावर अतिशय बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन गवळी व खडतरे दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा महर्षि वाल्मिकी संघ रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल. असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
पंढरपूर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांना निवेदन देताना महर्षि वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर अभंगराव, बापु अभंगराव, गणेश शिरसट, लखन अभंगराव, नाना कोळी, सुरज राठी, भैया माने आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments