श्री विठ्ठल अभियांत्रिकीच्या ६ विद्यार्थ्यांची ‘ई-इन्फोचिप्स’ कंपनीत इंटरव्युवद्वारे निवड

पंढरपूर LIVE 24 मे 2018


स्पर्धा परीक्षा आणि नामवंत  कंपनी यामध्ये स्वेरीचे विद्यार्थी विराजमान
पंढरपूरः- पुणे येथील ई-इन्फोचिप्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग विभागातील ६ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
       ई-इन्फोचिप्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीचे प्रमुख एच.आर समीर पाटील, निलेश रणपुरा व त्यांच्या निवड समितीने घेतलेल्या इंटरव्यूवमध्ये गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्तआदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून कॉम्पुटर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे वैभव कुलकर्णी, कल्याणी कुरणावळ, पूजा लामकाने, मृणालिनी बाजारे, गायत्री शिंदे व राणी खुळे या सहा विद्यार्थ्यांची ई-इन्फोचिप्स कंपनीत झाली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण अधिक गतीने वाढत असून कंपनीस पात्र असे विद्यार्थी घडविले जात आहेत. त्यामुळे अनेक विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी स्थिर होवून आपले करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात याचा सखोल अभ्यास करून मागणी तसा पुरवठाया तत्वाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिस्तवर्तणूक, इतरांबरोबर भाषा संभाषण करताना आपली बॉडी लॅग्वेज’ कशी असावीअसा आदी नोकरीसाठी संबधित अभ्यास व ट्रेनिंग विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ व प्रा. एस.व्ही.दर्शने, प्रा.एन.एस. पांढरे आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभलेआहे. परवाच झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षक तथा आर.टी.ओ. या स्पर्धा परीक्षेत स्वेरीचे तब्बल १४ माजी विद्यार्थी अधिकारी झाले आणि संतोष माळी हे विद्यार्थी UPSC परीक्षा ६१२ वा रँक मिळवून उत्तीर्ण झाले. अलिकडेच लागलेल्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राच्या निकालामध्ये या कॉलेजच्या४३ विद्यार्थ्यांनी १० पैकी १० एस.जी.पी.ए. मिळवून विद्यापीठात नवीन विक्रम केलेले आहे. याचा परिणाम म्हणून स्वेरीने प्रथम वर्ष अॅडमिशनमध्ये जिल्ह्यात आघाडीचे स्थान मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेतील विश्वस्त,स्वेरीच्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख प्रा. व्ही.डी.जाधव, इतर अधिष्ठातासर्व विभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  









महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments